IND vs SL Live Streaming Where To Watch Todays Asia Cup 2025 18th Match : भारत आणि श्रीलंका यांच्यात दुबईच्या मैदानात सुपर फोर लढतीतील अखेरचा सामना रंगणार आहे. या सामन्याआधीच यंदाच्या आशिया चषक स्पर्धेतील दोन फायनलिस्ट फिक्स झाले आहेत. साखळी फेरीत विजयी हॅटट्रिक मारून सुपर फोरमध्ये एन्ट्री मारणारा अन् गत टी-२० आशिया कप स्पर्धेतील चॅम्पियन श्रीलंका संघ फायनलमध्ये भारतीय संघाविरुद्ध भिडेल, असे वाटले होते. पण आधी बांगलादेश आणि मग पाकिस्तान विरुद्धच्या पराभवासह त्यांची फायनलची आस संपुष्टात आली. त्यामुळे भारत-श्रीलंका यांच्यातील लढतीला प्रदर्शनीय सामन्याचे स्वरुप आले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
टीम इंडिया विजयी 'सिक्सर' मारण्यासाठी तर श्रीलंका पराभवाची हॅटट्रिक रोखण्यासाठी जोर लावणार
भारतीय संघ हा सामना जिंकून विजयी सिक्सर मारत आत्मविश्वासाने फायनल खेळण्यासाठी प्रयत्नशील असेल. दुसऱ्या बाजूला सुपर फोरमधील पराभवाची हॅटट्रिक टाळून जाता जाता स्पर्धेचा शेवट गोड करण्यासाठी श्रीलंकन संघ मैदानात उतरेल. पण त्यांच्या डाळ शिजणं जरा कठीणच दिसते. इथं एक नजर टाकुयात IND vs SL यांच्यातील सामना कुठं अन् कसा पाहता येईल. कसा आहे आंतरराष्ट्रीय सामन्यातील या दोन संघातील रेकॉर्ड त्यासंदर्भातील सविस्तर...
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
भारत-श्रीलंका यांच्यातील T20I मधील हेड टू हेड रेकॉर्ड (India vs Sri Lanka T20I Head To Head Record)
आतरराष्ट्रीय टी-२० मध्ये आतापर्यंत हे दोन संघ ३१ वेळा समोरा समोर आले आहेत. आशिया चषक स्पर्धेतील यंदाच्या सुपर फोरमध्ये दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध ३२ वा सामना खेळतील. आतापर्यंत झालेल्या लढीत २१ वेळा भारतीय संघाने मैदान मारलं असून ९ वेळा श्रीलंकेच्या संघाने बाजी मारलीये.
कुठं अन् कशी पाहता येईल IND vs SL यांच्यातील मॅच? (India vs Sri Lanka Live Streaming And Telecast)
भारतात आशिया चषक स्पर्धेतील सामन्यांचे थेट प्रेक्षपण हे सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या माध्यमातून करण्यात येत आहे. टेलिव्हिजनशिवाय याशिवाय मोबाईलच्या माध्यमातून SonyLiv अॅप आणि वेबसाईटवर स्ट्रिमिंगसह फॅनकोडवरही भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील लढतीचा आनंद घेता येईल.
- लाईव्ह स्ट्रीमिंग : SonyLIV अॅप आणि वेबसाइटसह फॅनकोड
- टेलिव्हिजन: सोनी स्पोर्ट्स (Sony Sports 1) आणि सोनी स्पोर्ट्स ५ (Sony Sports 5) (इंग्रजी समालोचन)
- सोनी स्पोर्ट्स ३ (Sony Sports 3) (हिंदी समालोचन)
- सोनी स्पोर्ट्स ४ (Sony Sports 4) (तमिळ अन् तेलगू समालोचन)