IND vs SL Asia Cup 2025 India defeat Sri Lanka with help of Super Over : दुबईच्या मैदानात रंगलेल्या सुपर फोरमधील अखेरच्या लढतीत भारतीय संघाने सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेला पराभूत करत यंदाच्या हंगामात विजयी षटकार मारला. भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ५ विकेट्सच्या मोबदल्यात २०२ धावा करत श्रीलंकन संघासमोर २०३ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या ताफ्यातील सलामीवीर पथुम निसंकानं दमदार शतक झळकावले. त्याच्या खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत श्रीलंकन संघाने भारताची बरोबरी साधली. पण सुपर ओव्हरमध्ये लंकेचं काहीच चालले नाही. टीम इंडियाने अगदी सहज विजय निश्चित केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!सुपर ओव्हरमध्ये सिंग इज किंग शो!
सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेकडून कुसल परेरा आणि दसुन शनाका ही जोडी मैदानात उतरली. भारताकडून अर्शदीप सुपर ओव्हर घेऊन आला. त्याने पहिल्याच चेंडूवर परेराला रिंकू सिंह करवी झेलबाद केले. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या कामिंदु मेंडिसनं एक धाव घेतली. अर्शदीपनं मग वाइडच्या रुपात एक अवांतर धाव खर्च करत शनाकाची विकेट घेतली अन् सुपर ओव्हमध्ये श्रीलंकेचा संघ २ धावांतच ऑल आउट झाला. ( सुपर ओव्हरमध्ये दोन विकेट्स पडल्या की डाव संपतो.) भारताकडून कर्णधार सूर्यकुमार यादव आणि उप कर्णधार शुबमन गिल ही जोडी मैदानात उतरली अन् सूर्यानं पहिल्या चेंडूवर ३ धावा काढत सुपर ओव्हरमध्ये भारतीय संघाला विजय मिळवून दिला. आशिया कप स्पर्धेतील भारतीय संघाचा हा सलग सहावा विजय ठरला.
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हरचा ट्विस्ट (VIDEO)
बॅटिंगमध्ये पुन्हा एकदा अभिषेक शर्माचा जलवा, तिलक अन् संजूनंही लुटली मैफिल
पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. शुबमन गिल ३ चेंडूत ४ धावा काढून तंबूत परतला. सूर्यकुमार यादव १३ चेंडूत १२ धावांवर बाद झाला. पण त्यानंतर सलामीवीर अभिषेक शर्माच्या भात्यातून सलग तिसरे अर्धशतक आले. त्याने ३१ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने ६१ धावांची दमदार खेळी केली. संजू सॅमसन याने २३ चेंडूत १ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने ३९ धावांचे योगदान दिले. अखेरच्या षटकात तिलक वर्मानं ३४ चेंडूत केलेल्या नाबाद ४९ धावा आणि अक्षर पटेलनं १५ चेंडूत केलेल्या २१ धावांच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने निर्धारित २० षटकात ५ विेकेट्सच्या मोबदल्यात २०२ धावा केल्या होत्या. श्रीलंकेच्या संघाकडून असलंका, शनाका, हसरंगा, चमीरा आणि तीक्षणा यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.
निसंका ठरला 'हार के जीतनेवाला बाजीगर'
श्रीलंकेच्या संघाने टी-२० मध्ये धावांचा पाठलाग करताना कधीच २०० धावा केलेल्या नाहीत. त्यामुळे भारतीय संघासाठी हा पेपर सोपा वाटत होता. त्यात हार्दिक पांड्यानं कुसल मेंडिसला शून्यावर बाद केले. पण त्यानंतर पथुम निसंका आणि कुसल पेरार ही जोडी जमली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १३४ धावांची भागीदारी रचत टीम इंडियाचं टेन्शन वाढवलं होतं. वरूण चक्रवर्तीनं परेराला ५२ धावांवर तंबूचा रस्ता दाखला. कुलदीनं असलंकाला ५ (९) आणि अर्शदीपनं कामिंदु मेंडिसला २२ (११) धावांवर बाद करत टीम इंडियाला दिलासा दिला. पण निसंका होता तोपर्यंत मॅच लंकेच्या बाजूनंच झुकल्याचे दिसत होते. अखेरच्या षटकात हर्षित राणानं त्याची विकेट घेतली. त्याने या सामन्यात ५८ चेंडूत ७ चौकार आणि ६ षटकाराच्या मदतीने १०७ धावा केल्या. या दिमाखदार खेळीमुळे सामना गमावल्यावरही तो सामनावीर ठरला.
Web Summary : India defeated Sri Lanka in a dramatic Super Over after a tied Asia Cup match. Arshdeep's brilliant bowling restricted Sri Lanka to just two runs, paving the way for India's winning six on the first ball. India secured their sixth consecutive victory.
Web Summary : एशिया कप में भारत ने श्रीलंका को सुपर ओवर में हराया। अर्शदीप की शानदार गेंदबाजी से श्रीलंका दो रन ही बना सका। भारत ने पहली गेंद पर छक्का मारकर जीत हासिल की और लगातार छठी जीत दर्ज की।