Join us
Daily Top 2Weekly Top 5

आता तरी घ्या रे! ऋतुराज गायकवाडचा मोठा पराक्रम; पुजाराला मागे टाकत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा

टीम इंडियाकडून वनडेसह टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 17:30 IST

Open in App

भारतीय कसोटी क्रिकेटमध्ये गिल-गंभीरच्या नव्या पर्वात कोलकाताच्या घरच्या मैदानात टीम इंडियावर पराभवाची नामुष्की ओढावली. या पराभवामुळे पुन्हा एकदा कोच गौतम गंभीर निशाण्यावर आला आहे. जो खेळाडू तिन्ही प्रकारात खेळायला हवा त्याला एखाद्या फॉरमॅटमध्ये खेळवायचे आणि कसोटी संघात टी-२० खेळणाऱ्यांचा केलेला भरणा या मुद्यावर सोशल मीडियावर संघ निवडीवरुन प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात येत आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

ऋतुराज गायकवाची दमदार कामगिरी

एका बाजूला शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आणि संघातील बॅटर घरच्या मैदानावर धावांसाठी संघर्ष करताना दिसत असताना दुसऱ्या बाजूला मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडनं भारत 'अ' संघाकडून खेळताना दक्षिण आफ्रिका 'अ' विरुद्ध दमदार खेळीचा नजराणा पेश  करत सर्वांच लक्षवेधून घेतले आहे.  

"मी हे मान्यच करू शकत नाही..."; टीम इंडियाच्या पराभवानंतर चेतेश्वर पुजाराने चांगलंच सुनावलं

पुजाराचा विक्रम मोडीत काढत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा 

ऋतुराज गायकवाडनं दक्षिण आफ्रिका 'अ' विरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात ११७ धावांची खेळी करत भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्याच्या बॅटमधून नाबाद अर्धशतकी खेळी आली. या खेळीसह त्याने संघाला सलग दुसरा विजय मिळवून देत आपल्या बॅटिंगमधील धमक दाखवली. ही कामगिरी करताना त्याने चेतेश्वर पुजाराला मागे टाकत खास विक्रम रचला. एवढेच नाही तर लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वोच्च सरासरीसह धावा करणाऱ्या बॅटरच्या यादीत तो मायकेल बेव्हन पाठोपाठ दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे.

खेळाडूकारकिर्दसामनेडावनाबादधावासर्वोच्च धावसंख्यासरासरीशतकेअर्धशतके
मायकेल बेव्हन१९८९–२००६४२७३८५१२४१५१०३१५७*५७.८६१३११६
ऋतुराज गायकवाड२०१७–२०२५८८८५४५०९२२३*५७.८०१७१८
सॅम हेइन २०१३–२०२३६४६२१०३००४१६१*५७.७६१०१७
चेतेश्वर पुजारा२००६–२०२३१३०१२७२६५७५९१७४५७.०११६३४
विराट कोहली२००६–२०२५३३९३२६४९१५६९७१८३५६.६६५५८३

टीम इंडियाकडून वनडेसह टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली, पण...

 ऋतुराज गायकवाड हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत असला तरी टीम इंडियाकडून त्याला म्हणावी तशी संधी मिळताना दिसत नाही. आतापर्यंत त्याने ६ वनडे आणि २३ टी-२० सामने खेळले आहेत. कसोटी पदार्पणाची तर त्याला संधीच मिळालेली नाही. सध्याच्या घडीचा त्याचा फॉर्म पाहून बीसीसीआय निवडकर्ते त्याच्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडणार का? ते पाहण्याजोगे असेल. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ruturaj Gaikwad's stellar performance knocks on Team India's Test door.

Web Summary : Ruturaj Gaikwad's impressive form in domestic cricket, highlighted by his performance against South Africa 'A', puts pressure on selectors. He surpassed Pujara in List A average, raising questions about his Test inclusion after limited ODI and T20 opportunities.
टॅग्स :ऋतुराज गायकवाडचेतेश्वर पुजारादक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा २०२५भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाभारतीय क्रिकेट संघ