भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि हिटमॅन रोहित शर्मा आणि रनमशिन विराट कोहली पुन्हा एकदा मैदान गाजवण्यासाठी सज्ज आहेत. ३० नोव्हेंबरपासून भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका रंगणार आहे. रांचीच्या मैदानात या मालिकेतील पहिला सामना रंगणार आहे. या सामन्यात मैदानात उतरताच रोहित शर्मा आणि विराट कोहली ही जोडी इतिहास रचेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रोहित-विराटच्या निशाण्यावर आहे सचिन द्रविडचा महारेकॉर्ड
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी आतापर्यंत ३९१ आंतरराष्ट्रीय सामने एकत्र खेळले आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात ही जोडी भारताकडून सर्वाधिक सामने खेळण्याचा सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड या जोडीचा विक्रम मोडीत काढतील. सचिन-द्रविड या जोडीनं आपल्या मोठ्या कारकिर्दीत ३९१ आंतरराष्ट्रीय सामने एकत्र खेळल्याचा रेकॉर्ड आहे.
मैदानात उतरताच रोहित-विराट जोडी ठरेल 'नंबर वन'
रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघांनीही टी-२० पाठोपाठ कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ते फक्त आता वनडेतच सक्रीय आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वनडे मालिकेतील अखेरच्या सामन्यात दोघांचा जलवा पाहायला मिळाला होता. आता रांचीच्या मैदानात एकत्र मैदानात उतरताच रोहित-विराट भारताकडून सर्वाधिक सामने खेळणारी भारताची नंबर वन जोडी बनेल.
भारताकडून सर्वाधिक आंतरारष्ट्रीय सामने खेळणाऱ्या जोड्या
- ३९१ - रोहित-विराट
- ३९१ - सचिन-द्रविड
- ३६९ - द्रविड-गांगुली
- ३६७ - सचिन-कुंबळे
- ३४१ - सचिन-गांगुली
- ३०९ - कोहली-जडेजा
- २९३ - सचिन-अझरुद्दीन
- २८५ - कोहली-धोनी
भारत-दक्षिण आफ्रिका वनडे मालिकेचे वेळापत्रक
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना ३० नोव्हेंबरला रांचीच्या मैदानात खेळवण्यात येईल. त्यानं दोन्ही संघ ३ डिसेंबरला रायपूरच्या मैदानात दुसरा सामना खेळताना दिसली. ६ डिसेंबरला विशाखापट्टणमच्या मैदानातून या दोऱ्याची सांगता होणार आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडेसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, केएल राहुल (कर्णधार) (विकेट कीपर), रिषभ पंत (विकेट कीपर), वाशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, नीतीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, रुतुराज गायकवाड, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंह, ध्रुव जुरेल.
Web Summary : Rohit Sharma and Virat Kohli are poised to surpass Sachin Tendulkar and Rahul Dravid's record for most international matches played together for India in the upcoming ODI series against South Africa. The duo are set to achieve this milestone in the first ODI.
Web Summary : रोहित शर्मा और विराट कोहली दक्षिण अफ्रीका के खिलाफ आगामी वनडे श्रृंखला में भारत के लिए एक साथ सबसे अधिक अंतरराष्ट्रीय मैच खेलने के मामले में सचिन तेंदुलकर और राहुल द्रविड़ के रिकॉर्ड को तोड़ने के लिए तैयार हैं। यह जोड़ी पहले वनडे में यह उपलब्धि हासिल करेगी।