IND vs SA: बुमराह-अर्शदीपचं कौतुक; टीम इंडियाच्या फलंदाजीवर सूर्यानं 'या' शब्दांत व्यक्त केली नाराजी

सामन्यानंतर भारतीय कर्णधाराने संघ कुठे कमी पडला ते सांगत पुन्हा ताकदीने कमबॅक करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 01:22 IST2026-02-23T01:20:46+5:302026-02-23T01:22:13+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IND vs SA ICC T20 Word Cup 2026 Super 8 Match Suryakumar Yadav Indian Captain Statement After Defeat Against South Africa: | IND vs SA: बुमराह-अर्शदीपचं कौतुक; टीम इंडियाच्या फलंदाजीवर सूर्यानं 'या' शब्दांत व्यक्त केली नाराजी

IND vs SA: बुमराह-अर्शदीपचं कौतुक; टीम इंडियाच्या फलंदाजीवर सूर्यानं 'या' शब्दांत व्यक्त केली नाराजी

 Suryakumar Yadav Indian Captain Statement After Defeat Against South Africa : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी (२२ फेब्रुवारी) भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुपर ८ फेरीतील सामना खेळवण्यात आला. गत चॅम्पियन आणि यंदाच्या हंगामातील जेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या टीम इंडियाला ७६ धावांनी पराभूत करत दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सेमीफायनलच्या शर्यतीत आघाडी घेतली आहे. एवढेच नव्हे तर या विजयासह मोठ्या आत्मविश्वासाने त्यांनी पुन्हा एकदा फायनल खेळण्याची आणि यावेळी ती जिंकून दाखवण्यासाठी मोठा आत्मविश्वास मिळवला आहे. दुसरीकडे टीम इंडिया या पराभवामुळे अडचणीत सापडला आहे. या पराभवानंतर भारतीय संघाच्या कर्णधाराच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसून आली. सामन्यानंतर त्याने संघ कुठे कमी पडला ते सांगत पुन्हा ताकदीने कमबॅक करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. 

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
 

आम्ही सुरुवात चांगली केली, पण मधल्या षटकांत सामना फिरला 

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर सूर्यकुमार यादव म्हणाला की, "सुरुवातीला आम्ही चांगल्या स्थितीत होतो. गोलंदाजांनी सुरुवातीच्या टप्प्यात सर्वोत्तम गोलंदाजी केली. पण सातव्या षटकापासून ते पंधराव्या षटकांच्या दरम्यान क्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी सर्वोत्तम फलंदाजी करत कमबॅक केले. एकंदरीत गोलंदाजी चांगलीच झाली, पण फलंदाजीत आम्ही कमी पडलो. 

अभिषेक पुन्हा अपयशी, सुंदरचा प्रयोग फसला... 'ही' आहेत भारताच्या लाजिरवाण्या पराभवाची ५ कारणं

 "पॉवरप्लेमध्ये सामना जिंकता येत नाही, पण..." 

तो पुढे म्हणाला की, कधी कधी हे समजून घेण्याची गरज असते की, सामना पॉवरप्लेमध्ये जिंकता येत नाही, पण हरण्याची शक्यता नक्कीच अधिक असते. आम्ही परिस्थिती पाहून छोट्या छोट्या भागीदारीसह डावाला आकार देऊ शकलो नाही, अशा शब्दांत सूर्यानं फलंदाजांची शाळा घेतली. त्यानंतर हा खेळाचाच भाग आहे. या पराभवातून आम्ही शिकू, यावर चर्चा करून अधिक मजबुतीने पुनरागमन करू, असे तो म्हणाला.

बुमराह-अर्शदीपचं कौतुक

जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांनी कमालीची गोलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीला सुरुवातीलाच सुरुंग लावला होता. त्यांच्या गोलंदाजीच कौतुक करताना सूर्या म्हणाला की, "दोघे मिळून किती घातक ठरू शकतात हे सर्वांना ठाऊक आहे. आजही त्यांनी आठ षटकांत सुमारे पाच बळी घेत ४५ ते ५० धावाच खर्च केल्या. गोलंदाजीतील त्यांची भागीदारी ही टीम इंडियाची मोठी ताकद आहे."

Web Title : दक्षिण अफ्रीका से हार के बाद सूर्यकुमार ने बल्लेबाजी पर निराशा व्यक्त की।

Web Summary : सूर्यकुमार यादव ने दक्षिण अफ्रीका से भारत की हार के बाद बल्लेबाजी प्रदर्शन पर निराशा व्यक्त की। उन्होंने बुमराह और अर्शदीप की गेंदबाजी की प्रशंसा की लेकिन भविष्य के मैचों में मजबूत साझेदारी और अनुकूलन क्षमता की आवश्यकता पर जोर दिया।

Web Title : Surya critical of batting after India's loss to South Africa.

Web Summary : Suryakumar Yadav expressed disappointment with the batting performance after India's defeat to South Africa. He praised Bumrah and Arshdeep's bowling efforts but emphasized the need for stronger partnerships and adaptability in future matches.