IND vs SA, Gautam Gambhir After India Won The ODI Series : कसोटी मालिकेतील लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय संघाने अखेर वनडे मालिका जिंकत दक्षिण आफ्रिकेचा हिशोब चुकता केला. भारतीय संघाच्या मालिका विजयात माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दिग्गज सर्वात आघाडीवर राहिले. कोच गौतम गंभीरसाठी हा क्षण आणखी खास होता. कारण त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने जिंकलेली ही पहिली वनडे द्विपक्षीय मालिका ठरली. या विजयानंतर गौतम गंभीर याने पत्रकार परिषदेत कसोटी मालिकेनंतर जे काही घडलं त्यावर नाराजी व्यक्त केल्याचेही पाहायला मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वनडे मालिका विजयानंतर गंभीरनं काढला मनातला राग
वनडे मालिका जिंकल्यावर पत्रकारपरिषदेत गौतम गंभीरला कसोटी मालिकेतील पराभवनानंतर झालेल्या टीकेसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. याप्रश्नाचं उत्तर देताना गंभीरनं आपल्या मनातील राग काढला. ज्या लोकांना काही कळतं नाही असे लोक आपल्या कार्यक्षेत्राच्या बाहेरच्या गोष्टावर बोलू लागले आहेत, अशा आशयाच्या शब्दांत त्याने कसोटी मालिकेनंतर टीका करणाऱ्यांना खडेबोल सुनावले. भारताच्या कसोटीतील पराभवानंतर एकालाही शुभमन गिलच्या दुखापतीचा मुद्दा पराभवामागचे कारण असू शकतो, असे वाटले नाही, याचे आश्चर्य वाटले, असेही गंभीरने म्हटले आहे.
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
वनडे मालिका विजयानंतर गंभीरचा कसोटीनंतर ट्रोल करणाऱ्यांना टोला, म्हणाला...
कसोटीतील पराभवानंतर झालेल्या टीकेसंदर्भातील प्रश्नावर गौतम गंभीर म्हणाला की, लोक आणि प्रसारमाध्यमांतून खूप काही बोलले गेले. पण आम्ही पहिला सामना फक्त ३० धावांनी गमावला होता. त्यावेळी संघातील सर्वोत्तम फलंदाज आणि कर्णधार फलंदाजी करु शकला नाही. या गोष्टीचा कुणी साधा उल्लेखही केला नाही, याचे आश्चर्य वाटते. एका आयपीएल फ्रेंचायजी मालकाने कोचिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केला. त्यांनी तर क्रिकेटच्या वेगवेगळ्या प्रकारात वेगळा प्रशिक्षक असायला पाहिजे असा सल्ला देऊन टाकला. ज्यांना काहीच कळत नाही, असे लोक मर्यादा ओलांडून वाट्टेल ते बोलतात. आम्ही मर्यादा पाळतो, लोकांनी आपली मर्यादा ओळखावी, अशा शब्दांत गंभीर यांनी टीकारांना टोला हाणला आहे.
तो IPL मालक कोण?
घरच्या मैदानातील कसोटी मालिकेत भारतीय संघाच्या लाजिरवाण्या पराभवानंतर टीम इंडियावर चांगलीच टीका झाली. अनेकांनी कोच गौतम गंभीरवर निशाणा साधला. दिल्ली कॅपिटल्सचे मालक पार्थ जिंदाल यांनी भारतीय कसोटीत स्प्लिट कोचिंगचा विचार करण्याची वेळ आली आहे, अशी पोस्ट एक्स अकाउंटवरून शेर केली होती. हाच मुद्दा उकरून काढत गंभीरनं त्यांना चांगलेच सुनावल्याचे पाहायला मिळाले.