Join us

India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)

ICC वनडे वर्ल्ड कपची पहिली ट्रॉफी उंचावतानाचा खास क्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 01:52 IST

Open in App

India Lifts First ODI World Cup Trophy Perfect Celebration By Team India And Harmanpreet Kaur :  हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाने नवी मुंबई येथील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवरील सामना जिंकत इतिहास रचला.  महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनलमध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत पहिली वहिली वर्ल्ड ICC ट्रॉफी जिंकली.

  'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

हरमनप्रीत कौर ठरली महिला वर्ल्ड कप जिंकून देणारी पहिली कर्णधार

पाच वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणारी हरमनप्रीत कौर पहिल्यांदाच वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व करत होती. ती भारतीय महिला संघाला वर्ल्ड कप जिंकून देणारी पहिली महिला कर्णधार ठरली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या फायनलमध्ये हरमनप्रीतनं शेवटची विकेट मिळवून मॅच जिंकून देणारा  कॅच घेतला. या विजयानंतर संघातील सर्व खेळाडू भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. जे आनंदाश्रू  ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात दिसले तेच चित्र अनेक वर्षांपासून ज्या स्वप्नाची वाट पाहिली ते स्वप्न साकार झाल्यावर पाहायला मिळाले.

भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!

ट्रॉफी उंचावताना खास अंदाजात 

 

हरमनप्रीत कौर अँण्ड कंपनीनं पहिली ट्रॉफी उंचावल्यावर खास अंदाजा सेलिब्रेशन केले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल  होत आहे. २०२४ मध्ये भारतीय पुरुष संघाने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पराभूत करत टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली होती. त्यावेळी रोहित शर्मानं ट्रॉफीनंतर संघातील खेळाडूंसोबत केलेले सेलिब्रेशन चर्चेचा विषय ठरले होते. अगदी त्याच धाटणीत हमनप्रीत ब्रिगेडनंही ट्रॉफी उंचावताना हटके अंदाजात सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले. 

English
हिंदी सारांश
Web Title : India Women's Cricket Team Creates History, Lifts First ODI World Cup

Web Summary : Under Harmanpreet Kaur's leadership, the Indian women's team made history by winning their first ODI World Cup, defeating South Africa in the final at Navi Mumbai's DY Patil Stadium. Harmanpreet became the first captain to lead the Indian women's team to a World Cup victory.
टॅग्स :आयसीसी महिला विश्वचषक २०२५भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाहरनमप्रीत कौरस्मृती मानधनाभारतीय महिला क्रिकेट संघवन डे वर्ल्ड कप