Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs SA : टीम इंडियानं घरच्या मैदानात गुडघे टेकल्यावर नेटकऱ्यांना आठवला विराट; गंभीर होतोय ट्रोल

पाचव्या आणि अखेरच्या दिवशी भारतीय संघ पराभवाच्या छायेत असताना सोशल मीडियावर रंगली अशी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 10:59 IST

Open in App

Indian Test Cricket : घरच्या मैदानातील कसोटी मालिकेत पुन्हा एकदा टीम इंडियाने गुडघे टेकल्याचे पाहायला मिळाले. न्यूझीलंडविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय संघाने गिल आणि गंभीरच्या नव्या पर्वात वेस्ट इंडिजविरुद्धची २ सामन्यांची मालिका अगदी दाबात जिंकली. पण WTC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन दक्षिण आफ्रिकेच्या संघाने टीम इंडियाची अक्षरश: लाज काढली. ज्या भारतीय संघातील फलंदाज फिरकीचा सामना करण्यात आणि गोलंदाज प्रतिस्पर्धी खेळाडूंची फिरकी घेण्यात माहिर मानले जायचे त्यांच्या समोर आधी परदेशी पाहुण्या संघाने या दोन्ही क्षेत्रात तरबेज असल्याचे दाखवून दिले. पाचव्या आणि अखेरच्या दिवशी भारतीय संघ पराभवाच्या छायेत असताना सोशल मीडियावर भारतीय कसोटी संघाच्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. काहींना तर विराट कोहलीच्या कॅप्टन्सीतील दिवस आठवले आहेत. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

विराट कोहलीचा कॅप्टन्सीतील रुबाब!  

 दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय कसोटी संघाची बिकट अवस्था पाहून काहींना थेट विराट कोहलीच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियाचे भरभराटीचे दिवस आठवले आहेत. एका नेटकऱ्याने किंग कोहलीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात विराट कोहली शिटी वाजवत प्रेक्षकांना बाराव्या खेळाडूच्या रुपात भारतीय संघाचा उत्साह वाढवण्यासाठी प्रोत्साहित करताना पाहायला मिळते.

Yashasvi Jaiswal : खेळ मांडला! यशस्वीला गोलंदाजीची हाव; फलंदाजी वेळी मात्र आपली जबाबदारी विसरला!

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानात दोन कसोटी मालिकेत निर्विवाद वर्चव राखणारा एकमेव कर्णधार

विराट कोहलीच्या मैदानात भारतीय संघाने घरच्या मैदानात एकही कसोटी सामना गमावलेला नाही. एवढेच नाहीतर त्याच्या नेतृत्वाखाली २०२० मध्ये भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत क्लीन स्वीप देत २५ वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रेकेनं दिलेल्या जखमेवर मलम लावण्याचे काम केले होते. विराट कोहलीनं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतही संघाचे नेतृत्व करताना ३-० असा विजय मिळवून दिल्याचा रेकॉर्ड आहे.  इंग्लंड दौऱ्याआधी विराट कोहलीनं अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. यामागे गंभीरचं कारस्थान असल्याची गोष्टही चांगलीच चर्चेत राहिली होती. 

 गौतम गंभीर होतोय ट्रोल

एका बाजूला नेटकऱ्यांना विराट कोहली आठवला आहे. दुसऱ्या बाजूला टीम इंडियाचा कोच आणि गौतम गंभीर ट्रोल होताना दिसतोय. आजी माजी क्रिकेटरसह सोशल मीडियावर नेटकरी गौतम गंभीरच्या रणनीतीची खिल्ली उडवताना पाहायला मिळत आहे. अनुभवी आणि क्षमता असणाऱ्या खेळाडूंना बाहेर ठेवून मल्टी फॉरमॅटमध्ये खेळणाऱ्या ऑलराउंडर्सवर डाव लावण्याचा गौतम गंभीरनं खेळलेला डाव टीम इंडियाच्या अंगलट आल्याचे बोलले जात आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : India's Test Loss: Kohli Remembered, Gambhir Faces Troll Storm

Web Summary : India's home series loss to South Africa sparks Virat Kohli nostalgia. Fans recall his leadership amid Gautam Gambhir's coaching criticism. Kohli's captaincy, marked by home dominance, contrasts with the current struggles, fueling online debates about strategy.
टॅग्स :दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा २०२५भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाभारतीय क्रिकेट संघविराट कोहलीगौतम गंभीर