भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना विशाखापट्टणमच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. या सामन्यात अखेर दोन वर्षांनी आणि २० वेळा पदरी निराशा पडल्यावर नाणेफेकीचा कौल भारतीय संघाच्या बाजूनं लागला. लोकेश राहुलनं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टॉसचा बॉस होण्यासाठी KL राहुलनं खास ट्रिक वापरल्याचे पाहायला मिळाले. जाणून घेऊयात टॉसवेळीची रंजक गोष्ट अन् या सामन्यात टीम इंडिया कोणत्या बदलासह मैदानात उतरली त्यासंदर्भातील सविस्तर माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दोन वर्षांनी जिंकला टॉस
२०२३ च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील न्यूझीलंड विरुद्धच्या सेमीफायनलमध्ये भारतीय सघाने एकदिवसीय सामन्यात अखेरचा टॉस जिंकला होता. त्यानंतर रोहित शर्मा, शुभमन गिल आणि लोकेश राहुल यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सलग २० सामन्यात टॉस गमावल्याचे पाहायला मिळाले. दोन वर्षांनी अखेर टीम इंडियाने टॉस जिंकल्याचे पाहायला मिळाले.
...या खास ट्रिकसह KL राहुल ठरला टॉसचा बॉस
लोकेश राहुलनं मागील दोन सामन्यात टॉस गमावल्यानंतर खूप वाईट वाटते, ही भावना बोलून दाखवली होती. तिसऱ्या सामन्यात टॉस जिंकण्यावर फोकस असेल, असेही तो म्हणाला होता. तिसऱ्या सामन्यातील नाणेफेकी आधी डोळ बंद करून त्याने कौल आपल्या बाजूनं लागावा, यासाठी प्रार्थना केल्याचे पाहायला मिळाले. एवढेच नाही तर टॉसचा बॉस होण्यासाठी त्याने खास ट्रिक आजमावली अन् शेवटी ती कामही आली. लोकेश राहुल हा उजवा आहे. पण नाणेफेक जिंकण्यासाठी तो डावखुरा झाला. त्याने डाव्या हाताने नाणे हवेत भिरकावल्याचे पाहायला मिळाले. त्याची ही ट्रिक अखेर कामी आली आणि भारतीय संघाने नाणेफेक जिंकली.
वॉशिंग्टनच्या जागी तिलक वर्माची एन्ट्री
नाणेफेक जिंकल्यावर KL राहुलच्या चेहऱ्यावरील आनंद बघण्याजोगो होता. त्याने खास अंदाजात सेलिब्रेशनही केल्याचे पाहायला मिळाले. पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतल्याचा सांगताना त्याने संघात एक बदल केल्याची माहिती दिली. वॉशिंग्टन सुंदरच्या जागी तिलक वर्माची भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री मारली आहे.
भारतीय संघात कुणाला मिळाली संधी? (Team India Playing XI)
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, के. एल. राहुल (कर्णधार/यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा.
दक्षिण आफ्रिकेचा संघ (South Playing XI)
रायन रिकेल्टन, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक, टेम्बा बावुमा (कर्णधार), मॅथ्यू ब्रेट्झके, एडन मार्कराम, डेवाल्ड ब्रेविस, मार्को यान्सेन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, लुंगी एनगिडी, ओटनील बार्टमन.