Temba Bavuma on South Africa win aginst Team India, IND vs SA 2nd Test: भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या कसोटीत पराभव केला आणि कसोटी मालिका २-०ने जिंकली. पहिल्या कसोटीत खराब कामगिरीनंतर, भारतीय संघ या कसोटीत दमदार पुनरागमन करेल, अशी अपेक्षा होती. पण सर्व अपेक्षा फोल ठरल्या. आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना ४८९ धावा केल्या, प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव २०१ धावांत संपला. तिसऱ्या डावात आफ्रिकेने २६० धावा करत भारताला ५४९ धावांचे महाकाय लक्ष्य दिले होते. याचा पाठलाग करताना भारताचा डाव १४० धावांत आटोपला आणि भारताचा कसोटी इतिहासातील सर्वात मोठा ४०८ धावांचा पराभव झाला. आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमा याने आपल्या नेतृत्वाखाली एकही कसोटी सामना न हरण्याचा रेकॉर्ड कायम ठेवला. सामना आणि मालिका जिंकल्यावर त्याने आपल्या भावना स्पष्ट केल्या.
कर्णधार टेंबा बवुमा म्हणाला, "दुखापतीमुळे मी दोन महिने क्रिकेटपासून दूर होतो. त्यानंतर कमबॅक करून असा विजय मिळणे खूपच खास आहे. भारतात येऊन त्यांना २-०ने हरवणे सोपे नाही. सध्या आमच्या संघाचा सुवर्णकाळ सुरू आहे. हा मालिका विजय खूपच अभिमानास्पद आहे. आमच्यावर केलेल्या टीकेला आणि प्रश्नांना हे उत्तर आहे. आता आमच्या खेळाडूंच्या मानसिकतेतही बदल झाला आहे. आम्ही केलेली तयारी योग्य होती. मुथूसामी सारख्या नवख्या खेळाडूने केलेली खेळी अप्रतिम होती. संघ म्हणून खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला आहे आणि आता तो वाढतच जाईल."
या संघासोबत कुणाविरूद्धही खेळायला तयार
"स्पष्टता आणि संवाद यामुळे आमचा संघ चांगली कामगिरी करतोय. कर्णधार म्हणून काही वेळी गोलंदाजाच्या हातून चेंडू काढून घेणे कठीण होते. कारण त्यांना आणखी गोलंदाजी करायची असते. आम्ही बडी शतके ठोकली नाहीत पण चार-पाच खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली. या संघासोबत मी कोणासोबतही कसोटी क्रिकेट खेळायला तयार आहे," असा विश्वास वबुमाने व्यक्त केला.
सर्वांनी आपल्या भूमिका छान पार पडल्या
"सिमन हार्परने अप्रतिम गोलंदाजी केली. तो आधीही २०१५ मध्ये भारतात आला होता. तेव्हा त्याच्याकडे फारसा अनुभव नव्हता. यावेळी मात्र तो १० वर्षांच्या अनुभवासह आला आणि त्याने सारा खेळ पालटून टाकला. त्याने केशव महाराजला चांगली साथ दिली. त्यातच तो उंच असल्याने त्याला फायदा मिळतो. त्या दोघांमध्ये असलेली स्पर्धा एक कर्णधार म्हणून मला आनंद देऊन जाते. सर्वांनीच आपल्या भूमिका छान पार पाडल्या. त्यामुळेच आम्ही आनंदी आहे," असे बवुमाने सांगितले.
Web Summary : South Africa defeated India in the second Test, winning the series 2-0. Captain Bavuma, after the win, highlighted the team's mental fortitude and the significance of the victory, emphasizing the team's clear communication and preparation.
Web Summary : दक्षिण अफ्रीका ने दूसरे टेस्ट में भारत को हराया, श्रृंखला 2-0 से जीती। कप्तान बवुमा ने जीत के बाद टीम के मानसिक साहस और जीत के महत्व पर प्रकाश डाला, टीम के स्पष्ट संचार और तैयारी पर जोर दिया।