IND vs SA 2nd Test (Marathi News) : मोहम्मद सिराजने ( Mohammed SIRAJ ) दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेची अवस्था बिकट केली आहे. पहिली कसोटी गमावल्यानंतर भारतीय संघ केप टाऊन येथे विजयाच्या निर्धाराने मैदानावर उतरला. मागील ३२ वर्षात भारताला एकदाही आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. याही वर्षी हाच निकाल कायम राहणे अपेक्षित आहे, परंतु दुसऱ्या कसोटीत भारतीय गोलंदाजांनी गाजवलेले वर्चस्व थक्क करणारे आहे.
मोहम्मद सिराजमुळे १२२ वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेवर ओढावली नामुष्की; Video
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. एडन मार्करम व डीन एल्गर ही सलामीची जोडी २० चेंडूच टिकली. सिराजने चौथ्या षटकात एडनला ( २) झेलबाद करून माघारी पाठवले. कर्णधार एल्गर ( ४) याचाही सिराजने त्रिफळा उडवून भारताला मोठं यश मिळवून दिलं. टॉनी डे जॉर्जी ( २) व पदार्पणवीर त्रिस्तान स्टब्स ( ३) हेही फार काही करू शकले नाही. जसप्रीत बुमराहने ९व्या षठकात स्टब्सला बाद केले, तर सिराजने जॉर्जीचा अडथळा दूर करून आफ्रिकेची अवस्था ४ बाद १५ अशी दयनीय केली.
१९२७ मध्ये घरच्या मैदानावर शेवटचं आफ्रिकेचे ६ फलंदाज ३५ किंवा त्यापेक्षा कमी धावांवर ( ६-२६ वि. इंग्लंड, जोहान्सबर्ग) माघारी परतले होते. एकंदर १९३२ नंतर दोनवेळाच आफ्रिकेवर ही नामुष्की ओढावली होती. २०१५ नंतर आज आफ्रिकेचे ६ फलंदाज ३५ किंवा त्यापेक्षा कमी धावांवर तंबूत परतले आणि दोन्ही वेळा भारताविरुद्ध त्यांनी नांग्या टाकल्या.