IND vs SA 2nd Test : मोहम्मद सिराजमुळे १२२ वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेवर ओढावली नामुष्की; Video 

IND vs SA 2nd Test : भारतीय संघ कसोटी मालिका बरोबरीत सोडवण्याच्या निर्धाराने मैदानावर उतरला. मोहम्मद सिराज व जसप्रीत बुमराह या जोडीने यजमान दक्षिण आफ्रिकेला दणके दिले.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 02:39 PM2024-01-03T14:39:07+5:302024-01-03T14:39:33+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SA 2nd Test Live Updates Marathi : South Africa 15/4; What a start this has been for India, Mohammed Siraj take 3 wickets, Video   | IND vs SA 2nd Test : मोहम्मद सिराजमुळे १२२ वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेवर ओढावली नामुष्की; Video 

IND vs SA 2nd Test : मोहम्मद सिराजमुळे १२२ वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेवर ओढावली नामुष्की; Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs SA 2nd Test : भारतीय संघ कसोटी मालिका बरोबरीत सोडवण्याच्या निर्धाराने मैदानावर उतरला. मोहम्मद सिराज व जसप्रीत बुमराह या जोडीने यजमान दक्षिण आफ्रिकेला दणके दिले. मागील ३२ वर्षात भारताला एकदाही आफ्रिकेच्या धरतीवर मालिका जिंकता आलेली नाही. यंदा देखील त्याचाच प्रत्यय पाहायला मिळाला अन् यजमानांनी वर्चस्व कायम ठेवले होते. पण, दुसऱ्या कसोटीत भारतीय गोलंदाजांनी कमाल केली. 


दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात दोन मोठे बदल करण्यात आले असून, रवींद्र जडेजा आणि मुकेश कुमार यांना संधी मिळाली आहे, तर आर अश्विन आणि शार्दुल ठाकूर यांना वगळण्यात आले आहे. एडन मार्करम व डीन एल्गर ही जोडी सलामीला आली आणि जेमतेम २० चेंडू टीकली... मोहम्मद सिराजने चौथ्या षटकात एडनला ( २) यशस्वी जैस्वालच्या हाती झेलबाद करून माघारी पाठवले. मागील सामन्यातील नायक आणि या कसोटीतील कर्णधार एल्गर ( ४) याचाही सिराजने त्रिफळा उडवून भारताला मोठं यश मिळवून दिलं.


टॉनी डे जॉर्जी ( २) व पदार्पणवीर त्रिस्तान स्टब्स ( ३) हेही फार काही करू शकले नाही. जसप्रीत बुमराहने ९व्या षठकात स्टब्सला बाद केले, तर सिराजने जॉर्जीचा अडथळा दूर करून आफ्रिकेची अवस्था ४ बाद १५ अशी दयनीय केली. घरच्या मैदानावर आफ्रिका तिसऱ्यांदा आघाडीचे ४ फलंदाज १५ धावांत माघारी परतले. १९०२ नंतर ( ४-१२ वि. ऑस्ट्रेलिया, केप टाऊन ) प्रथमच आफ्रिकेची अशी वाईट अवस्था झाली आहे. त्याआधी १८८९मध्ये इंग्लंडविरुद्ध केप टाऊन येथेच १२ धावांत ४ फलंदाज माघारी परतले होते.  



 १९३२ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न कसोटीत आफ्रिकेचे आघाडीचे ४ फलंदाज ५ किंवा त्यापेक्षा कमी धावा करून माघारी परतले होते. आज ९२ वर्षानंतर त्यांची ही अवस्था झाली.  

Web Title: IND vs SA 2nd Test Live Updates Marathi : South Africa 15/4; What a start this has been for India, Mohammed Siraj take 3 wickets, Video  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.