IND vs SA 2nd T20I India Captain Suryakumar Yadav Wins Toss : भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने नाणेफेकी वेळीच्या पराभवाची मालिका अखेर खंडीत केली आहे. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा टी-२० सामना न्यू चंडीगड येथील महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. या सामन्यात सूर्यकुमार यादवनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ कोणत्याही बदलाशिवाय मैदानात उतरला असून दक्षिण आफ्रिकेच्या संघाने मालिकेत कमबॅक करण्यासाठी तीन बदल केले आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सूर्यानं आजमवाला हा फंडा
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकण्यासाठी KL राहुलची कॉपी करत डाव्या हाताने नाणे उंचावल्याचे पाहायला मिळाले होते. पण KL राहुलप्रमाणे तो काही यशश्वी ठरला नाही. यावेळी नाणे अधिक उंच भिरकावण्याचा फंडा आजमावला आणि नाणेफेकीचा कौल भारतीय संघाच्या बाजूनं लागला.
भारत प्लेइंग इलेव्हन :
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, अक्षर पटेल, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (w), जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन :
रीझा हेंड्रिक्स, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), एडन मार्करम (कर्णधार), डेवाल्ड ब्रेविस, डेव्हिड मिलर, डोनोव्हन फरेरा, जॉर्ज लिंडे, मार्को यान्सेन, लुथो सिपामला, लुंगी एनगिडी, ओटनील बार्टमन.