Join us

Ind vs SA 2nd T20I: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२०साठी रोहित शर्मा घेणार कटू निर्णय? या खेळाडूंना मिळणार डच्चू, असा असेल अंतिम संघ

Ind vs SA 2nd T20I: दुसऱ्या टी-२० सामन्यासाठी टीम इंडियाची तयारी अंतिम टप्प्यात असून, या सामन्यासाठी संघव्यवस्थापन आणि कर्णधार रोहित शर्मा हे भारतीय संघात काही बदल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सामन्यासाठी टीम इंडियाचा अंतिम संघ अशाप्रकारे असू शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2022 13:34 IST

Open in App

गुवाहाटी - भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघांमध्ये दुसरा टी-२० सामना हा रविवारी गुवाहाटीमध्ये खेळवला जाणार आहे. टी-२० विश्वचषकाच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवला होता. दरम्यान, दुसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियाची तयारी अंतिम टप्प्यात असून, या सामन्यासाठी संघव्यवस्थापन आणि कर्णधार रोहित शर्मा हे भारतीय संघात काही बदल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सामन्यासाठी टीम इंडियाचा अंतिम संघ अशाप्रकारे असू शकतो.

या सामन्यातही लोकेश राहुल आणि रोहित शर्मा हे सलामीला येतील. तर तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली खेळण्यास येईल. गेल्या काही सामन्यात आकर्षक  खेळी करून फॉर्ममध्ये परतण्याचे संकेत दिले आहेत. याशिवाय जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या लोकेश राहुलचे चौथे स्थान निश्चित आहे. तर यष्टीरक्षणाची जबाबदारी पुन्हा एकदा दिनेश कार्तिकला मिळू शकते.

दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजला अंतिम संघात स्थान मिळू शकते. तर दीपक चहर आणि अर्षदीप सिंह यांनाही संघात संधी मिळू शकते. तर फॉर्ममध्ये असलेल्या अक्षर पटेलसह रविचंद्रन अश्विनकडे फिरकी माऱ्याची धुरा सोपवली जाऊ शकते. त्यामुळे हर्षल पटेलला संघाबाहेर बसावे लागू शकते.

अशी असू शकते टीम इंडियारोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल,विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अर्षदीप सिंह, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, अक्षर पटेल,  रविचंद्रन अश्विन

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाभारतीय क्रिकेट संघटी-20 क्रिकेट
Open in App