Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs SA : पंचांनी चेंडू बदलून दिला, पण... KL राहुलनं कोणावर फोडलं पराभवाचं खापर?   

दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर नेमकं काय म्हणाला KL राहुल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 23:19 IST

Open in App

IND vs SA 2nd ODI Indian Skipper KL Raul After South Africa Chases Down 359 At Raipur : रायपूरच्या मैदानात रंगलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने टीम इंडियावर पलटवार केला. टीम इंडियाने दिलेल्या ३५९ धावांचा यशस्वी पाठलाग करत ऐतिहासिक विजय पाहुण्या संघाने ३ सान्यांच्या वनडे मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. टॉस गमावण्यासोबतच मोक्याच्या क्षणी क्षेत्ररक्षणातील ढिसाळपणा आणि पहिल्यांदा फलंदाजी करताना या मैदानात आवश्यक धावसंख्येपेक्षा २०-३० धावा कमी पडल्यामुळे पराभवाची वेळ आली, अशा आशयाचे वक्तव्य भारतीय एकदिवीसीय संघाचा कार्यवाहू कर्णधार लोकेश राहुल याने केले आहे.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

३५० पेक्षा अधिक धावा करून दुसऱ्यांदा ओढावली पराभवाची नामुष्की

भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाडच्या शतकी खेळीशिवाय लोकेश राहुलच्या अर्धशतकाच्या जोरावर ३५८ धावा केल्या होत्या. ३५० पेक्षा अधिक धावा केल्यावर भारतीय संघाने याआधी फक्त ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकमेव पराभव पत्करला होता. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्यादा टीम इंडियाला पराभवाची नामुष्की ओढावल्याचे पाहायला मिळाले.

IND vs SA : मार्करमच्या सेंच्युरीच्या जोरावर द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम; ऐतिहासिक विजयासह साधला बरोबरीचा डाव

दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर काय म्हणाला KL राहुल?

लोकेश राहुल म्हणाला की, मैदानात दव असल्यामुळे दुसऱ्या डावात गोलंदाजी करणं कठीण होते. पंचांनी बदलून दिला ही आमच्यासाठी चांगली गोष्ट होती. पण या सामन्यात नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा होता. सलग दोन सामन्यात नाणेफेक गमावल्याचे वाईट वाटत आहे. धावफलकावर ३५० पेक्षा अधिक धावा म्हणजे चांगली धावसंख्या आहे असे वाटते. पण ड्रेसिंग सगळ्यांना कल्पना होती की, आम्ही २०-२५ धावा कमी काढल्या आहेत. त्यात क्षेत्ररक्षणावेळीही आमच्याकडून काही चुका झाल्या. लोअर बटिंग ऑर्डरमधून आणखी धावांचे योगदान अपेक्षित होते, असे म्हणत केएल राहुलनं टॉससह खराब क्षेत्ररक्षणासह अखेरच्या टप्प्यात धावा झाल्या नाहीत हे मान्य केले आहे.

 किंग कोहलीसह ऋतुराज गायकवाडवर स्तुती सुमनांचा वर्षाव

विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाड या जोडीनं सुंदर कामगिरी केली. विराट नेहमीच त्याच काम अगदी उत्तमरित्या बजावतो. ऋतुराजनं कमालीची बॅटिंग केली. फिरकीविरुद्ध त्याने आक्रमक अंदाजात फलंदाजी केल्यामुळे भारतीय संघाला अतिरिक्त धावा मिळता आल्य, असे सांगत त्याने शतकवीरांवर कौतुकाचा वर्षाव केल्याचेही पाहायला मिळाले. दोघांनी दमदार सुरुवात करून दिल्यामुळे मी सहाव्या क्रमांकावर येण्याएवजी पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलो, ही गोष्टही त्याने बोलून दाखवली.  

English
हिंदी सारांश
Web Title : KL Rahul blames fielding, missed runs for India's loss to SA.

Web Summary : KL Rahul attributed India's ODI loss to South Africa to poor fielding, being 20-30 runs short, and the difficulty of bowling second due to dew. He praised Kohli and Gaikwad's centuries but acknowledged the need for improvement in lower-order batting.
टॅग्स :दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा २०२५भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकालोकेश राहुलभारतीय क्रिकेट संघविराट कोहलीऋतुराज गायकवाड