Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs SA 1st Test Day 2 Stumps : दुसऱ्या दिवशी जड्डूचा जलवा! तिसऱ्या दिवशीच लागणार निकाल?

  पहिल्या डावात टीम इंडियाला २०० धावांच्या आत रोखत दक्षिण आफ्रिकेनं सामना बरोबरीत आणला. पण दुसऱ्या डावात भारतीय फिरकीपटूंनी पुन्हा सामना टीम इंडियाच्या बाजूनं वळवला आहे.  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 16:51 IST

Open in App

IND vs SA 1st Test Day 2 Stumps South Africa Lead By 63 Runs But : कोलकाता येथील ईडन गार्डन्सच्या मैदानात रंगलेल्या पहिल्या सामन्यातील दुसऱ्या दिवसाच्या खेळात फिरकीची जादू पाहायला मिळाली. फिरकीपटू सायमन हार्मर याने मारलेला 'चौकार' आणि त्याला मार्को यान्सेन याने दिलेली साथ याच्या जोरावर दुसऱ्या दिवसाच्या खेळात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने टीम इंडियाला पहिल्या डावात १८९ धावांवर रोखले. पहिल्या डावात भारतीय संघाने ३० धावांची अल्प आघाडी घेतली.  पहिल्या डावात टीम इंडियाला २०० धावांच्या आत रोखत दक्षिण आफ्रिकेनं सामना बरोबरीत आणला. पण दुसऱ्या डावात भारतीय फिरकीपटूंनी पुन्हा सामना टीम इंडियाच्या बाजूनं वळवला आहे.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

  दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात गोलंदाजीत जड्डू, कुलदीप यादव आणि अक्षर पटेलचा जलवा पाहायला मिळाला. या त्रिकुटाच्या फिरकीच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या दिवसाअखेर दक्षिण आफ्रिकेची अवस्था ७ बाद  ९३ धावा अशी केली आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा अजूनही मैदानात असला तरी दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून फक्त ६३ धावांची आघाडी आहे. त्यामुळे या सामन्याचा निकाल तिसऱ्या दिवशीच लागेल, असे चित्र निर्माण झाले आहे. भारतीय संघ अखेरच्या तीन विकेट्स लवकरात लवकर घेऊन मॅचवरील पकड मजबूत करण्यावर भर देईल. दुसऱ्या बाजूला  दक्षिण आफ्रिकेच्या संघाला सामना आव्हानात्मक करण्यासाठी किमान शंभर धावा कराव्या लागतील.

Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास

English
हिंदी सारांश
Web Title : Jaddu shines! India vs SA Test match result on day 3?

Web Summary : Indian bowlers, especially Jaddu, Kuldeep, and Patel, dominated Day 2. South Africa leads by 63 runs with 7 wickets down. Match result likely on Day 3.
टॅग्स :दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा २०२५भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाभारतीय क्रिकेट संघरवींद्र जडेजाकुलदीप यादवअक्षर पटेल