IND vs PAK Unusual Scene At The Toss Of The Asia Cup 2025 Final Two Representatives From Each Team : भारत-पाक यांच्यातील फायनलमध्ये नो हँडशेक पॉलिसी कायम राहिली. याशिवाय टॉस वेळी आणखी एक वेगळी गोष्ट पाहायला मिळाली. भारत पाक यांच्यातील लढती वेळी टॉस वेळी तुमच्या कॅप्टनला काय विचारायचं तुम्ही बघा आमच्या कॅप्टनचं आम्ही बघतो, असे काहीसे दृश्य पाहायला मिळाले. कोणत्याही मॅचसाठी टॉस वेळी एकच सूत्रसंचालक (प्रेझेंटेटर) मैदानात असतो. पण यावेळी भारत-पाकिस्तान यांच्यातील मेगा फायनलमध्ये दोन सूत्रसंचालक दिसले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
टॉस वेळी काय घडलं? असं चित्र पहिल्यांदाच घडलं
भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव याने पहिल्या दोन सामन्यातील नो हँडशेक पॉलिसी कायम ठेवत पाकिस्तानी कर्णधारापासून दूरावा कायम ठेवला. पण यावेळी भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक आणि विद्यमान प्रेझेंटेटर रवी शास्त्री यांनी पाकिस्तानी कर्णधार सलमान अली आगाशी संवाद साधला नाही. भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर शास्त्री यांनी त्याच्याशी संवाद साधला. पण सलमान अली आगा बोलायला आल्यावर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वकार यूनिस पिक्चरमध्ये आला. एका सामन्यात टॉस वेळी आपापल्या प्रेझेंटटरनं कर्णधाराची मुलाख घेण्याची क्रिकेटच्या मैदानातील ही पहिलीच वेळ आहे.
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
जाणून घ्या मैदानात जे चित्र दिसलं त्यामागचं कारण...
आशिया कप स्पर्धेत भारत पाकिस्तान यांच्यात पहिल्या सामन्यापासून वादाची मालिका सुरु आहे. हस्तांदोलन प्रकरण गाजल्यावरही भारतीय संघाने फायलमध्येही आपल्या भूमिकेवर ठाम राहण्याची भूमिका स्पष्ट केली होती. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या विनंतीनुसार आशियाई क्रिकेट परिषदेनं (ACC) या फायनलसाठी तटस्थ सूत्रसंचालक ठेवावा, असा निर्णय घेतला होता. त्यानंतर शास्त्री आणि वकार यांनी भारत व पाकिस्तान कर्णधारांची स्वतंत्र मुलाखत घेतल्याचे पाहायला मिळाले.
Web Title : IND vs PAK एशिया कप फाइनल: दो प्रस्तोता के साथ अनोखा टॉस!
Web Summary : एशिया कप फाइनल में बिना हाथ मिलाए और दो प्रस्तोता के साथ टॉस हुआ। भारत ने टॉस जीतकर गेंदबाजी करने का फैसला किया। पीसीबी के अनुरोध पर एक तटस्थ प्रस्तोता नियुक्त किया गया था।
Web Title : IND vs PAK Asia Cup Final: Unique Toss with Two Presenters!
Web Summary : Asia Cup final toss saw no handshake and two presenters. India chose to bowl after winning the toss. A neutral presenter was appointed after a request from PCB.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.