IND vs PAK T20 Asia Cup 2025, Big Mistake Before Playde Pakistan National Anthem : भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-२० आशिया चषक स्पर्धेतील सामना रंगला आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर रंगलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानी कर्णधार सलमान अली आगा याने पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मॅच आधी परंपरेनुसार, दोन्ही संघांतील खेळाडू राष्ट्रगीतासाठी उभे राहिले. यावेळी पाकिस्तानच राष्ट्रगीता ऐवजी DJ वाल्या बाबूनं काही सेकंदासाठी भलतंच गाणं वाजवलं. ही मोठी चूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पाकिस्तानी राष्ट्रगीत सुरु होण्याआधी वाजलं भलतंच गाणं
भारत-पाक यांच्यातील लढतीला सुरुवात होण्याआधी दोन्ही संघ राष्ट्रगीतासाठी मैदानात उभे राहिले. पहिल्यांदा पाकिस्तानचं राष्ट्रगीत वाजलं. त्याआधी जवळपास चार सेकंद आयटम साँग वाजलं. ते ऐकून पाकिस्तानी खेळाडूंसह प्रेक्षकांनीही भुवया उंचावल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसून येते. तात्काळ ही चूक सुधारण्यात आली. पण जे घडलं त्या काही सेकंदाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय.
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
सूर्याच्या त्या कृतीनं देखील वेधलं लक्ष
आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाने कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तान विरुद्ध खेळू नये, अशी जोरदार मागणी भारतीय चाहत्यांसह वेगवेगळ्या क्षेत्रातून झाली. याच गोष्ट लक्षात घेऊन भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवनं लाखो भारतीयांच्या भावना जपण्यासाठी टॉस वेळी जपली जाणारी परंपरा मोडीत काढत कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान संघाच्या कर्णधारासोबत ना हस्तांदोलन केलं ना काही दोघांमध्ये बोलणं झालं. सूर्याची ही कृतीही चर्चेचा विषय ठरत आहे. सूर्यकुमार यादवसाठी पाक विरुद्धचा सामना अधिक खास आहे. बर्थडेच्या दिवशी पाक विरुद्ध पहिल्यांदाच तो टीम इंडियाचे नेतृत्व करण्यासाठी उतरला आहे. महेंद्रसिंह धोनी, रोहित शर्मा आणि विराट कोहलीनंतर तो भारताचा चौथा कॅप्टन ठरला जो टी-२० मध्ये पाकविरुद्ध टीम इंडियाचं नेतृत्व करत आहे.