IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?

पाक विरुद्धच्या लढतीआधी टीम इंडियाच्या मुख्य कोचसह कॅप्टनचा पत्रकार परिषदेपासून दूरावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 02:53 IST2025-09-14T02:08:17+5:302025-09-14T02:53:04+5:30

whatsapp join usJoin us
IND vs PAK Assistant Coach Ryan Ten Doeschate Press Conference Focus on Cricket amid boycott calls Gautam Gambhir Gambhir’s message to Team India Squad A More | IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?

IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India Coach Breaks Silence Amid Calls To Boycott Asia Cup Match vs Pakistan : आशिया चषक २०२५ स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारत-पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघ एकमेकांना भिडणार आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाने कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानच्या संघा विरुद्ध खेळू नये, असा सूर उमटत असताना आशियाई क्रिकेट परिषदेनं (ACC) दोन्ही संघांना एकाच गटात ठेवत स्पर्धा खेळवण्याचा निर्णय घेतला. आता १४ सप्टेंबरला नियोजित वेळापत्रकानुसार, दुबईच्या आंतरारष्ट्रीय स्टेडियमवर भारत-पाक यांच्यातील सामना खेळवण्यात येणार आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

पाक विरुद्धच्या लढतीआधी टीम इंडियाच्या मुख्य कोचसह कॅप्टनचा पत्रकार परिषदेपासून दूरावा

एरव्ही ज्या सामन्याची क्रिकेट चाहते उत्सुकतेनं वाट पाहायचे त्या भारत-पाक हायहोल्टेज सामन्यासंदर्भात देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. BCCI ही नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे. दरम्यान पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याआधी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेपासून भारतीय संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादवसह अन्य खेळाडूंना दूरच ठेवण्यात आल्याचे दिसून आले. भारतीय क्रिकेट संघाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन नील टेन डोशेट यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. जे नँदरलँडचे आहेत. संघाच्या रणनितीशिवाय त्यांनी कोच गौतम गंभीर यांनी खेळाडूंना काय संदेश दिलाय ती गोष्टही यावेळी सांगितली आहे. 

कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)

प्रशिक्षक गंभीर यांनी खेळाडूंना काय संदेश दिलाय?

या सामन्याआधी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भारतीय क्रिकेट संघाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन नील टेन डोशेट म्हणाले की, ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत त्याकडे लक्ष न देता क्रिकेटवर लक्षकेंद्रीत करा, असा स्पष्ट संदेश गौतीनं (गौतम गंभीर) संघातील खेळाडूंना दिलाय.  

टीम इंडियातील प्रत्येकजण जनतेच्या भावना जाणतो, पण...

भारत-पाक सामन्याला होणाऱ्या विरोधासंदर्भातील प्रश्नाचं उत्तर देताना ते पुढे म्हणाले की, आमच्यासाठी खेळ आणि राजकारण या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मला वाटतं की, आम्ही बीसीसीआय आणि सरकारच्या सूचनेचं पालन करत आहोत. सामन्याला विरोध होणार याची कल्पना होती. ते त्रासदायकही आहे. हा खूपच संवेदनशील मुद्दा आहे. टीम इंडियातील खेळाडू जनतेच्या भावना समजतात. टीम मीटिंगमध्ये आमची याविषयावर चर्चाही झालीये. असे सांगत त्यांनी इथं खेळाडू फक्त क्रिकेट खेळायला आले आहेत, अशा शब्दांत टीम इंडियाची भूमिका मांडली.

Web Title: IND vs PAK Assistant Coach Ryan Ten Doeschate Press Conference Focus on Cricket amid boycott calls Gautam Gambhir Gambhir’s message to Team India Squad A More

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.