Join us

पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

टीम इंडियाच्या स्ट्रेंथ अँण्ड कंडीशनिंग कोचनी शेअर केली Bronco Test संदर्भातील गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 19:29 IST

Open in App

Hardik Pandya Jasprit Bumrah Indian Players Underwent The Bronco Test Ahead Of Clash Against Pakistan : आशिया चषक स्पर्धेत विक्रमी विजयासह सलामी दिल्यावर भारतीय संघ आता हायहोल्टेज लढतीत मोठा धमाका करण्याच्या तयारीला लागला आहे. १४ सप्टेंबरला दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत-पाकिस्तान यांच्यातील लढत रंगणार आहे. २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर दोन्ही संघ समोरा समोर येणार आहेत. पुन्हा एकदा पाकला पराभवाचा दणका देण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरेल.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

जसप्रीत बुमराह अन् पांड्यासह संघातील खेळाडूंनी दिली कठोर फिटनेस टेस्ट 

 या लढतीत हिट शो देण्यासाठी भारतीय संघानं फिटनेसवर खास भर दिलाा. बीसीसीआयने टीम इंडियातील खेळाडूंचा एक खास व्हिडिओ शेअर केला असून यात भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्यासह अन्य खेळाडू कठोर फिटनेस टेस्ट देत मैदानात घाम गाळताना दिसत आहे.  

बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...

टीम इंडियाच्या स्ट्रेंथ अँण्ड कंडीशनिंग कोचनी शेअर केली Bronco Test संदर्भातील गोष्ट

आतापर्यंत भारतीय संघातील खेळाडू फिटनेस सिद्ध करण्यासाठी यो यो टेस्ट देत होते. पण स्टेंथ अँण्ड कंडिशनिंग कोच अँड्रियन ले रॉक्स यांनी संघातील खेळाडूंचा स्टॅमिना अन् फिटनेसचा दर्जा वाढवण्यासाठी Bronco Test वर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. ही टेस्ट आधीच्या तुलनेत अधिक कठोर आहे. यासंदर्भात स्टेंथ अँण्ड कंडिशनिंग कोच म्हणाले की, यात खेळाडूंना तीन टप्प्यात १२०० मीटर धावायचे असते. पहिल्या सेटमध्ये २० मीटर धावत पुन्हा परत येणे, दुसऱ्या सेटमध्ये ४० मीटर आणि तिसऱ्या सेटमध्ये हीच स्टेप ६० मीटर धावत करायची असते. पाच वेळा ही कसरत घेत खेळाडूंच्या फिटनेसचा अंदाज घेता येतो, ही एक फिल्ड टेस्ट आहे. त्यामुळे कुठंही ती अगदी सहज घेता येते. असेही कोच म्हणाले. बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओत संघातील अनेक खेळाडू या टेस्टच्या माध्यमातून हिट शो देण्यासाठी फिट असल्याचे दाखवून देताना दिसत आहे.

टॅग्स :आशिया कप २०२५एशिया कपभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध पाकिस्तान