IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : आशिया चषक स्पर्धेच्या १७ हंगामातील ४१ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान यांच्यात फायनल रंगणार आहे. दोन्ही संघातील लढत म्हणजे क्रिकेटच्या मैदानातील 'महायुद्ध'च मानले जाते. टी-२० मध्ये सातत्याने टीम इंडियासमोर पाकनं लोटांगण घातल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यात आशियाई देशांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत भारतीय संघाचा दबदबा आहे. टीम इंडियानं आतापर्यंत ८ वेळा ही स्पर्धा जिंकलीये. यात ७ वेळा वनडे तर एकदा टी-२० मधील जेतेपदाचा समावेश आहे. दुसऱ्या बाजूला पाकिस्तानच्या संघाने आतापर्यंत दोन वेळा या स्पर्धेत बाजी मारलीये. इथं एक नजर टाकुयात भारत-पाक यांच्यातील क्रिकेटच्या मैदानातील 'महायुद्ध' कुठं पाहता येईल.? टी-२० क्रिकेटमध्ये कसा राहिलाय दोन्ही संघांचा एकमेकांविरुद्धचा रेकॉर्ड यासंदर्भातील सविस्तर....
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कोणत्या मैदानात रंगणार भारत-पाक यांच्यातील फायनल?
आशिया चषक २०२५ स्पर्धेतील भारत-पाकिस्तान यांच्यातील हायहोल्टेज सामना दुबईतील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. फायनल आधी यंदाच्या हंगामात दोन वेळा याच मैदानावर भारत-पाक यांच्यातील सामना रंगल्याचे पाहायला मिळाले होते. हे दोन्ही सामने भारतीय संघाने जिंकले आहेत. गट-सामन्यात भारताने पाकिस्तानच्या संघाला ७ विकेट्सने पराभव केला होता. या सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवसह कुलदीप यादवनं खास छाप सोडली होती. सुपर फोरमधील लढतीत अभिषेक शर्मा नावाचं वादळ घोंगावलं. त्याने ३९ चेंडूत केलेल्या ७४ धावांच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने पाकला मात दिली.
INDIA VS PAKISTAN FINAL सामना कधी?
भारत-पाक यांच्यातील अंतिम सामना हा रात्री ८ वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार) सुरू होणार असून भारतात सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग आणि लाईव्ह प्रसारण पाहायला मिळणार आहे.
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
भारत-पाक यांच्यातील T20I मधील हेड-टू-हेड रेकॉर्ड्स
आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांत भारतीय संघाचे पारडे हे जड दिसते. आतापर्यंत दोन्ही संघ १४ वेळा समोरासमोर आले आहेत. यात भारतीय संघ ११-३ अशा मोठ्या फरकाने आघाडीवर आहे. २००७ च्या पहिल्या वहिल्या टी२० वर्ल्ड कप स्पर्धेत दोन्ही संघ फायनल खेळले होते. ज्यात भारतीय संघाने बाजी मारली होती. याच स्पर्धेत एक सामना बरोबरीत सुटल्यावर बॉल आउटमध्ये टीम इंडिया भारी ठरली होती.
IND vs PAK Asia Cup 2025 Final सामना कुठं पाहता येईल?
- लाईव्ह स्ट्रिमिंग : SonyLIV अॅप आणि वेबसाईटवर
- टेलिव्हिजनवरील प्रसारण : Sony Sports Ten 1, Sony Sports Ten 1 HD, Sony Sports Ten 5, Sony Sports Ten 5 HD.
- प्रादेशिक भाषेत प्रसारण : Sony Sports Ten 3 (हिंदी), Sony Sports Ten 3 HD (हिंदी), Sony Sports Ten 4 (तमिळ व तेलुगू).
आशिया कप २०२५ स्पर्धेसाठीचा भारतीय संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा, रिंकू सिंह.
आशिया कप २०२५ स्पर्धेसाठी भारत-पाक संघ
भारत (India) | पाकिस्तान (Pakistan) |
---|---|
सूर्यकुमार यादव (कर्णधार) | सलमान अली आगा (कर्णधार) |
शुभमन गिल (उपकर्णधार) | अबरार अहमद |
अभिषेक शर्मा | फहीम अशरफ |
तिलक वर्मा | फखर झमान |
हार्दिक पांड्या | हारिस राउफ |
शिवम दुबे | हसन अली |
अक्षर पटेल | हसन नवाझ |
जितेश शर्मा | हुसेन तलत |
जसप्रीत बुमराह | खुशदिल शाह |
वरुण चक्रवर्ती | मोहम्मद हारिस |
अर्शदीप सिंग | मोहम्मद नवाझ |
कुलदीप यादव | मोहम्मद वसीम ज्युनियर |
संजू सॅमसन | साहिबजादा फरहान |
हर्षित राणा | सईम अयूब |
रिंकू सिंह | सलमान मिर्झा |
शाहीन शा आफ्रिदी | |
सुुफयान मोकीम |
Web Summary : India and Pakistan face off in the Asia Cup 2025 final, a historic first. India dominates with 8 titles. The high-voltage match will be held in Dubai. Watch live on SonyLIV and Sony Sports.
Web Summary : एशिया कप 2025 के फाइनल में भारत और पाकिस्तान का मुकाबला, एक ऐतिहासिक पहली। भारत 8 खिताब के साथ हावी है। हाई-वोल्टेज मैच दुबई में होगा। सोनी लिव और सोनी स्पोर्ट्स पर लाइव देखें।