Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs NZ : कोहलीनं पेश केला खास नजराणा; इंदूरच्या मैदानातील 'विराट' दुष्काळ संपला, अन्...

न्यूझीलंडविरुद्ध वनडेत सर्वाधिक ५०+ धावांची खेळी करण्यात दुसऱ्या स्थानावर आहे विराट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 20:09 IST

Open in App

IND vs NZ 3rd ODI Virat Kohli  : भारत-न्यूझीलंड यांच्यातील निर्णायक सामन्यातील ३०० पारच्या लढाईत विराट कोहलीनं आपल्या फलंदाजीचा खास नजराणा पेश करत इंदूर येथील होळकरच्या स्टेडियमवर मोठा दुष्काळ संपवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या संघाने टीम इंडियासमोर ३३८ धावांचे टार्गेट ठेवले. या धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा, शुभमन गिल आणि केएल राहुल स्वस्तात बाद झाल्यावर संघ अडचणीत असताना किंग कोहलीनं आपला फलंदाजीतील क्लास दाखवला. २२ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेत कोहलीनं ५१ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

इंदूरच्या मैदानातील 'विराट' दुष्काळ संपला

इंदूर येथील होळकर स्टेडियमवर हे फलंदाजांसाठी अनुकूल आहे. पण देश विदेशातील मैदानात किंग ठरलेला कोहली या मैदानात आतापर्यंत एकही अर्धशतक झळकावू शकला नव्हता. आतापर्यंत ४ वनडेत विराट कोहलीनं फक्त ९९ धावा केल्या होत्या. अखेर न्यूझीलंडविरुद्धच्या निर्णायक सामन्यात त्याने या मैदानात पहिले अर्धशतक साजरे केले. एवढेच नाही तर न्यूझीलंडविरुद्ध १७ व्या वेळी ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याच्या खास विक्रमाला गवसणी घातली आहे.

Virat Kohli Viral Video : किंग कोहलीनं आधी शतकवीर डॅरिल मिचेलला दाद दिली, मग...

न्यूझीलंडविरुद्ध वनडेत सर्वाधिक ५०+ धावांच्या खेळी

  • १८ – रिकी पॉन्टिंग (५० डाव)
  • १७ – विराट कोहली (३६ डाव)*
  • १४ – डीन जोन्स (२७ डाव)
  • १४ – कुमार संगकारा (४५ डाव) 

न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत सर्वाधिक वेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम हा ऑस्ट्रेलियन दिग्गज रिकी पाँटिंगच्या नावे आहे. पाँटिंगनं ५० डावात १८ वेळा ही कामगिरी केली आहे. विराट कोहलीनं ३६ व्या डावात १७ वेळा ही कमाल करून दाखवली आहे. 

   

English
हिंदी सारांश
Web Title : Kohli ends Indore drought with crucial fifty against New Zealand.

Web Summary : Virat Kohli scored a vital half-century in the India vs. New Zealand ODI, ending his drought at Indore's Holkar Stadium. He reached his fifty in 51 balls, marking his first half-century at the venue and his 17th 50+ score against New Zealand.
टॅग्स :न्यूझीलंडचा भारत दौराभारत विरुद्ध न्यूझीलंडविराट कोहलीभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघ