Virat Kohli Viral Video : किंग कोहलीनं आधी शतकवीर डॅरिल मिचेलला दाद दिली, मग...

व्हिडिओ सोशल मीडियावर होत आहे व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 19:01 IST2026-01-18T18:55:53+5:302026-01-18T19:01:49+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IND vs NZ 3rd ODI Virat Kohli Appreciating The Innings Of Daryl Mitchell And Then Literally Pushing Off The Field Video Goes Viral | Virat Kohli Viral Video : किंग कोहलीनं आधी शतकवीर डॅरिल मिचेलला दाद दिली, मग...

Virat Kohli Viral Video : किंग कोहलीनं आधी शतकवीर डॅरिल मिचेलला दाद दिली, मग...

IND vs NZ 3rd ODI Virat Kohli And Daryl Mitchell Viral Video : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि अखेरचा वनडे सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळवण्यात आला.  या सामन्यात न्यूझीलंडच्या डॅरिल मिचेलने शानदार शतक झळकावले. सलग दुसऱ्या शतकासह त्याने खास विक्रमालाही गवसणी घातली. टीम इंडियाविरुद्ध त्याच्या भात्यातून सलग पाचव्यांदा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी पाहायला मिळाली. क्रिकेट जगतात कोणत्याही फलंदाजाला भारतीय मैदानात अशी कामगिरी करता आलेली नाही. एका बाजूला त्याच्या विक्रमी शतकाची चर्चा रंगत असताना तो बाद झाल्यावर विराट कोहलीनं केलेली कृती चर्चेचा विषय ठरत आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

किंग कोहलीनं आधी मिचेलच्या खेळीला दाद दिली, मग....

डॅरिल मिचेलने १३१ चेंडूंमध्ये १५ चौकार आणि ३ षटकारांसह १३७ धावा केल्या. मोहम्मद सिराजनं त्याच्या धमाकेदार खेळीला ब्रेक लावला. बाद झाल्यावर पॅव्हेलियनमध्ये परतत असताना सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या किंग कोहलीनं आधी टाळ्या वाजवत त्याच्या विक्रमी शतकी खेळीला दाद दिली.  त्यानंतर मजेशीर अंदाजात विराट कोहलीनं न्यूझीलंड बॅटर डॅरिल मिचेल याला धक्का देऊन बाहेर काढत असल्याचा अभिनय केला.  

Daryl Mitchell नं सेंच्युरीसह रचला इतिहास! टीम इंडियाविरुद्ध अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज

व्हिडिओ सोशल मीडियावर होत आहे व्हायरल

विराट कोहलीनं अगदी मजेशीर अंदाजात डॅरिल मिचेल याला पॅव्हेलियनच्या दिशेनं ढकलताना दिसला. भारतीय स्टार बॅटरच्या कृतीनंतर डॅरिल मिचेलच्या चेहऱ्यावरही हसू फुलल्याचे दिसले. दोघांच्यातील खिलाडूवृत्ती आणि मैत्रीची एक खास झलक पाहायला मिळाली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. 

डॅरिल मिचेलनं कडक सेंच्युरीसह ठोकली कोहलीला मागे टाकून 'नंबर वन' होण्याची दावेदारी

डॅरिल मिचेल याने टीम इंडियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत सातत्यपूर्ण कामगिरी करून दाखवत ICC क्रमवारीत विराट कोहलीला मागे टाकण्यासाठी शड्डू ठोकला आहे. भारत-न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्याआधी विराट कोहली ICC क्रमवारीत रोहित शर्माला मागे टाकून नंबर वन ठरला होता. त्याच्या पाठोपाठ एका रेटिंग पॉइंटच्या अंतरासह डॅरिल मिचेल दुसऱ्या स्थानावर होता. सलग दोन शतकासह डॅरिल मिचेल याने वनडेत 'नंबर वन'ची दावेदारी पक्की केली आहे. 
 

Web Title : कोहली ने मिचेल के शतक की सराहना की, फिर मज़ाकिया अंदाज़ में मैदान से हटाया

Web Summary : भारत बनाम न्यूजीलैंड वनडे में, डेरिल मिचेल ने शतक बनाया। विराट कोहली ने मिचेल की पारी की सराहना की और मज़ाकिया अंदाज़ में उसे मैदान से बाहर जाने का इशारा किया। मिचेल का प्रदर्शन कोहली की आईसीसी रैंकिंग को चुनौती दे रहा है।

Web Title : Kohli Applauds Mitchell's Century, Then Playfully Shoves Him Off Field

Web Summary : During the India vs. New Zealand ODI, Daryl Mitchell scored a century. Virat Kohli applauded Mitchell's innings but playfully acted as if to push him off the field as he walked back to the pavilion. Mitchell's consistent performance is challenging Kohli's ICC ranking.