IND vs NZ 5th T20I Suryakumar Yadav Record : न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने आणखी एका अर्धशतकासह टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत धमाका करण्यासाठी तयार असल्याचे संकेत दिले आहेत. २६ चेंडूतील अर्धशतकासह या सामन्यात सूर्यानं आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत ३००० धावांचा पल्ला पार करण्याचा वर्ल्ड रेकॉर्डही आपल्या नावे केला. विराट कोहली आणि रोहित शर्मापेक्षाही कमी चेंडूत त्याने हा डाव साधला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
विराट-रोहितसह अनेक दिग्गजांना टाकले मागे
आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात सर्वात जलद ३००० धावा पूर्ण करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत (चेंडूंनुसार) सूर्या आता अव्वलस्थानावर विराजमान झाला आहे. सूर्यकुमारने अवघ्या १८२२ चेंडूंमध्ये हा टप्पा गाठला आणि विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय दिग्गजांना मागे टाकले.
Ishan Kishan Maiden T20I Century: इशान किशन ऑन मिशन! वादळी खेळीसह ठोकली शानदार सेंच्युरी
याआधी मोहम्मद वसीमच्या नावे होता वर्ल्ड रेकॉर्ड
याआधी विराट कोहलीने ३००० धावा पूर्ण करण्यासाठी २१६९ चेंडू, तर रोहित शर्माने २१४९ चेंडू घेतले होते. या यादीत मोहम्मद वसीम, जोस बटलर, अॅरॉन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर यांचाही समावेश आहे. मात्र, आपल्या वेगवान धावगतीमुळे आणि आक्रमक खेळशैलीमुळे सूर्यकुमार यादव आता या यादीत अव्वल स्थानी पोहचला आहे.
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद ३००० धावा करणारे फलंदाज (चेंडूंनुसार)
- १८२२ चेंडूत - सूर्यकुमार यादव
- १९४७ चेंडूत - मोहम्मद वसीम
- २०६८ चेंडूत - जोस बटलर
- २०७७ चेंडूत - अॅरॉन फिंच
- २११३ चेंडूत - डेविड वॉर्नर
- २१४९ चेंडूत - रोहित शर्मा
- २१६९ – विराट कोहली
सूर्याचं दमदार अर्धशतक तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाचवा आणि अखेरचा टी-२० सामना खेळवण्यात आला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय फलंदाजांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. अभिषेक शर्मा १६ चेंडूंत ३० धावा करून परतल्यावर इशान किशन आणि सूर्या जोडी जमली. दोघांनी शतकी भागीदारी केली. त्यांच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर टीम इंडियाने निर्धारित २० षटकात २७१ धावा करत न्यूझीलंडविरुद्ध सर्वोच्च धावसंख्या उभारली. सूर्यकुमार यादवने अवघ्या ३० चेंडूंमध्ये ६३ धावा केल्या. त्याची ही खेळी ४ चौकार आणि ६ षटकारांनी बहरलेली होती.
Web Summary : Suryakumar Yadav smashed the record for the fastest 3000 T20I runs, achieving the feat in just 1822 balls. He outpaced Virat Kohli and Rohit Sharma, signaling strong World Cup form with a blistering half-century against New Zealand. India dominated the match.
Web Summary : सूर्यकुमार यादव ने सबसे तेज़ 3000 टी20 रन बनाने का रिकॉर्ड तोड़ा, केवल 1822 गेंदों में यह उपलब्धि हासिल की। उन्होंने विराट कोहली और रोहित शर्मा को पीछे छोड़ दिया, और न्यूजीलैंड के खिलाफ तूफानी अर्धशतक के साथ विश्व कप के लिए अपनी मजबूत फॉर्म का संकेत दिया। भारत ने मैच में दबदबा बनाया।