Ishan Kishan Maiden T20I Century: इशान किशन ऑन मिशन! वादळी खेळीसह ठोकली शानदार सेंच्युरी

४२ व्या चेंडूवर षटकार ठोकत या खेळीचं त्याने शतकात रुपांतर केले. इशान किशनची टी-२० मधील ही पहिली सेंच्युरी ठरली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 20:27 IST2026-01-31T20:25:49+5:302026-01-31T20:27:21+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
India vs New Zealand 5th T20I Ishan Kishan Maiden T20I Century with a Six He also completes 1000 T20I runs | Ishan Kishan Maiden T20I Century: इशान किशन ऑन मिशन! वादळी खेळीसह ठोकली शानदार सेंच्युरी

Ishan Kishan Maiden T20I Century: इशान किशन ऑन मिशन! वादळी खेळीसह ठोकली शानदार सेंच्युरी

India vs New Zealand 5th T20I Ishan Kishan Maiden T20I Century : न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात दोन्ही सलामीवीर माघारी फिरल्यावर इशान किशनचा आणखी एक शानदार शो पाहायला मिळाला. तुफान फटकेबाजीचा नजराणा पेश करताना त्याने २८ चेंडूत या मालिकेतील दुसरे अर्धशतक पूर्ण केले. १२ व्या षटकात खणखणीत चौकारासह अर्धशतक पूर्ण करताना त्याने  ईश सोधीच्या षटकात चौकार षटकारांची आतषबाजी करत २९ धावा कुटल्या. ४२ व्या चेंडूवर षटकार ठोकत या खेळीचं त्याने शतकात रुपांतर केले. इशान किशनची टी-२० मधील ही पहिली सेंच्युरी ठरली.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

न्यूझीलंडविरुद्धची सर्वात जलद शतक अन् १००० धावांचा पल्लाही गाठला

इशान किशन याने ३६ व्या आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यातील ३६ व्या सामन्यात पहिले शतक झळकावताना १००० धावांचा पल्लाही पार केला. आता त्याच्या खात्यात १०११ धावांची नोंद आहे. इशान किशन याने ४२ चेंडूत शतक साजरे केले. न्यूझीलंडविरुद्ध कोणत्याही भारतीय खेळाडूच्या बॅटमधून आलेली ही सर्वात जलद शतक ठरले. एकंदरीत विचार करता भारताकडून टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो पाचव्या तर क्रिकेट जगतातील त्याचे हे सातवे जलद शतक आहे.  

T20 World Cup 2026 : टीम इंडियासह 'या' संघात ३०० धावा करण्याची ताकद; रवी शास्त्रींची मोठी भविष्यवाणी

इशान किशनची आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्येचा रेकॉर्ड

  • विरुद्ध श्रीलंका
    लखनौ, २०२२ – ८९ (५६ चेंडू)

  • विरुद्ध न्यूझीलंड
    रांची, २०२६ – ७६ (३२ चेंडू)

  • विरुद्ध दक्षिण आफ्रिका
    नवी दिल्ली, २०२२ – ७६ (४८ चेंडू)

  • विरुद्ध ऑस्ट्रेलिया
    विशाखापट्टणम, २०२३ – ५८ (३९ चेंडू)

 टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सलामीवीराच्या रुपात ठोकली दावेदारी

देशांतर्गत क्रिकेटमधील धमाकेदार कामगिरीच्या जोरावर  इशान किशन याने टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघात आपले स्थान पक्के केले.  न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने दोन वर्षांहून अधिक काळानंतर कमबॅक केले.  या मालिकेतील शानदार शोसह वर्ल्ड कप स्पर्धेत त्याने सलामीवीराच्या रुपात सर्वोत्तम पर्याय असल्याची कामगिरी करून दाखवली आहे. या दौऱ्यानंतर आगामी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत तो अभिषेक शर्माच्या साथीनं डावाला सुरुवात करताना दिसू शकते.

Web Title : ईशान किशन ने न्यूजीलैंड के खिलाफ टी20 में पहला शतक जड़ा

Web Summary : ईशान किशन ने न्यूजीलैंड के खिलाफ शानदार प्रदर्शन करते हुए अपना पहला टी20 शतक बनाया। शुरुआती विकेट गिरने के बाद, किशन ने आक्रामक बल्लेबाजी का प्रदर्शन किया, 28 गेंदों में अर्धशतक और 42 में शतक पूरा किया, जो एक यादगार पारी रही।

Web Title : Ishan Kishan Smashes Maiden T20I Century Against New Zealand

Web Summary : Ishan Kishan delivered a stunning performance against New Zealand, scoring his first T20I century. After early wickets, Kishan showcased aggressive batting, reaching his half-century in 28 balls and converting it to a century in 42, marking a memorable innings.