Team India Next Goal Is Olympic Gold Suryakumar Yadav After India's T20WC Triumph टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या दहाव्या हंगामातील जेतेपदावर नाव कोरत टीम इंडियाने जगातील सर्वात मोठे स्टेडियम असलेल्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर नवा इतिहास रचला. आतापर्यंत जे कोणत्याही संघाला जमलं नाही ते सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने करून दाखवलं.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
महेंद्रसिंह धोनी (२००७) आणि रोहित शर्मा (२०२४) या दिग्गज कर्णधारांच्या यादीत आता सूर्यकुमार यादवचा समावेश झाला आहे. त्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने छोट्या फॉरमॅटमध्ये मोठा धमाका करत तिसऱ्यांदा टी-२० वर्ल्ड कप ट्रॉफी उंचावली. भारतीय संघाने सलग दुसऱ्या जेतेपदासह घरच्या मैदानात ही स्पर्धा जिंकण्याचा मोठा डावही साधला. या ऐतिहासिक विजयावर समाधान व्यक्त करताना सूर्यकुमार यादवनं आता ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकायचं हाच ध्यास आहे, असे बोलून दाखवले.
भारत बनला चैंपियन | IND v NZ T20 WC Final Match Highlights
संघातील प्रत्येकाच्या योगदानामुळे इतिहास घडला
कॅप्टन्सीत पहिल्यांदा टी-२० वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकणं हा अतिशय सुंदर आणि अविस्मरणीय क्षण आहे. अहमदाबादच्या मैदानात मिळवलेल्या यश हे सांघिक यश असल्याचेही त्याने अधोरेखित केले. फायनल बाजी मारल्यावर सूर्यकुमार यादव याने पत्रकार परिषदेत यंदाच्या हंगामातील प्रवास अन् मिळालेले यश यावर भाष्य केले. स्पर्धेची सुरुवात संघाच्या अपेक्षेप्रमाणे झाली नव्हती, पण संघ हळूहळू ट्रॅकवर आला आणि स्पर्धा गाजवली, असे त्याने म्हटले आहे.
आता पुढचे ध्येय ऑलिम्पिक गोल्ड
यंदाच्या हंगामातील स्पर्धेतील महिन्याभराचा प्रवास खूपच खास होता. सुरुवात जशी आम्हाला हवी होती तशी झाली नाही, पण तो खेळाचा भाग असतो. शेवटी हा संपूर्ण प्रवास आमच्यासाठी अविस्मरणीय ठरला. संघ म्हणून आम्ही जे साध्य केले आहे ते सर्वांसमोर आहे. त्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत. पुढील लक्ष्य अर्थातच ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक पटकवण्यासह त्याच वर्षी (२०२८) होणारा टी-२० वर्ल्ड कप असेल,” असे सूर्यकुमार यादवने म्हटले आहे.
२०२४ पासूनची दृष्टीकोनच बदलला अन्...
भारतीय कर्णधाराने सांगितले की, २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपासून संघाच्या खेळण्याच्या पद्धतीत मोठा बदल झाला. त्या वेळी संघाने अधिक आक्रमक आणि आधुनिक क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. त्यामुळे मोठ्या स्पर्धांमध्ये सातत्याने यश मिळत आहे. हीच सवय पुढेही २०२७, २०२८, २०२९ मध्ये कायम ठेवायची आहे, असेही तो म्हणाला आहे.
Web Summary : After winning the T20 World Cup, Suryakumar Yadav sets his sights on Olympic gold. Team India's victory at Narendra Modi Stadium marks a historic moment. Yadav credits team effort and looks forward to continued success.
Web Summary : टी20 वर्ल्ड कप जीतने के बाद, सूर्यकुमार यादव ने ओलंपिक गोल्ड पर ध्यान केंद्रित किया। नरेंद्र मोदी स्टेडियम में टीम इंडिया की जीत एक ऐतिहासिक क्षण है। यादव टीम के प्रयास को श्रेय देते हैं और निरंतर सफलता की उम्मीद करते हैं।