Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs NZ : टीम इंडियाकडून अर्शदीपचा 'पंजा'! विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना न्यूझीलंड 'ऑल आउट'

टीम इंडियाने पाहुण्या संघाला 'ऑल आउट' करत आगामी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रबळ दावेदार असल्याचा शड्डू ठोकला आहे.   

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 22:39 IST

Open in App

IND vs NZ 5th T20I  इशान-सूर्या आणि हार्दिक या त्रिकुटाच्या कडक फलंदाजीनंतर गोलंदाजीत अर्शदीप सिंगनं मारलेल्या 'पंजा'च्या जोरावर भारतीय संघाने तिरुवनंतपुरमच्या मैदानात मोठ्या विजयाची नोंद केली. पहिल्यांदा फलंदाजी करताना टीम इंडियाने निर्धारित २० षटकात ५ विकेट्सच्या मोबदल्यात २७१ धावा केल्या होत्या. या विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या संघाकडून या मालिकेतील पहिला सामना खेळणाऱ्या फिन ॲलन याने दमदार फटकेबाजी केली. पण इतर फलंदाजांनी नांगी टाकल्यामुळे न्यूझीलंडचा संघ २२५ पर्यंतच मजल मारू शकला. विशेष म्हणजे टीम इंडियाने पाहुण्या संघाला 'ऑल आउट' करत आगामी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रबळ दावेदार असल्याचा शड्डू ठोकला आहे.   

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

दमदार कमबॅकसह अर्शदीपचा 'पंजा' 

न्यूझीलंडच्या संघाने मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना दमदार सुरुवात केली. अर्शदीप सिंग घेऊन आलेल्या पहिल्या षटकात ५ चेंडूत किवी संघातील बॅटर्संनी १७ धावा कुटल्या. पण या षटकातील अखेरच्या चेंडूवर अर्शदीप सिंगनं टिम सिफर्टला तंबूचा रस्ता दाखवला.  पहिल्या दोन षटकात ४० धावा खर्च केलेल्या अर्शदीप सिंगनं अखेरच्या दोन षटकात दमदार कमबॅक करत ११ धावा खर्च करत चार विकेट्स घेत फाइव्ह विकेट्स हॉलचा डाव साधला. 

Ishan Kishan Maiden T20I Century: इशान किशन ऑन मिशन! वादळी खेळीसह ठोकली शानदार सेंच्युरी

फिन ॲलनचं कडक अर्धशतकाशिवाय फक्त तिघांनी गाठला दुहेरी आकडा

भारतीय संघाने दिलेल्या मोठ्या आणि विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या संघाकडून सलामीवीर फिन ॲलन याने ३८ चेंडूत ८ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने २१०.५३ च्या स्ट्राइक रेटनं ८० धावांची दमदार खेळी केली. त्याच्याशिवाय रचिन रविंद्र ३० (१७), डॅरिल मिचेल २६ (१२) आणि ईश सोधी ३३ (१५)  या तिघांनी दुहेरी आकडा गाठला. पण यातील एकालाही मोठी खेळी करता आली नाही. भारताकडून अर्शदीप सिंगनं पहिल्यांदाच पाच विकेट्सचा डाव साधला. दुखापतीतून सावरून कमबॅकचा सामना खेळणाऱ्या अक्षर पटेलनं या ३ तर वरुण चक्रवर्ती आणि रिंकू सिंह यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.

भारताकडून इशानच्या शानदार शतकाशिवाय सूर्या अन् हार्दिक पांड्याचा जलवा

टीम इंडियाकडून पहिल्यांदा फलंदाजी करताना इशान किशन याने आपल्या आंतरारष्ट्रीय टी-२० कारकिर्दीतील पहिले शतक साजरे करताना ४३ चेंडूत १०३ धावांची खेळी केली. सूर्यकुमार यादनं ३० चेंडूत केलेल्या ८३ धावा, हार्दिक पांड्याची १७ चेंडूतील ४२ धावांची धमाकेदार खेळी आणि अभिषेक शर्मान १६ चेंडूत ३० धावा करत संघाला करुन दिलेल्या दमदार खेळीच्या जोरावर भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात निर्धारित २० षटकात ५ विकेट्सच्या मोबदल्यात २७१ धावा केल्या होत्या. किवी संघाविरुद्ध कोणत्याही संघाने छोट्या फॉरमॅटमध्ये केलेली ही सर्वात मोठी धावसंख्या ठरली.

English
हिंदी सारांश
Web Title : Arshdeep's 'Five-fer' seals India's victory against New Zealand in T20.

Web Summary : India defeated New Zealand in a T20 match, fueled by strong batting from Ishan, Surya, and Hardik. Arshdeep's five-wicket haul led to New Zealand being all out while chasing a target of 271. Despite Allen's efforts, New Zealand fell short, solidifying India's World Cup claim.
टॅग्स :न्यूझीलंडचा भारत दौराभारत विरुद्ध न्यूझीलंडअर्शदीप सिंगइशान किशनसूर्यकुमार यादवहार्दिक पांड्यावरूण चक्रवर्तीअक्षर पटेल