इशान किशनची शानदार सेंच्युरी सूर्यकुमार यादवची कडक फिफ्टी अन् त्यानंतर हार्दिक पांड्याचा धमाकेदार शो याच्या जोरावर भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात निर्धारित २० षटकात ५ बाद २७१ धावा केल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्ध कोणत्याही संघाने आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. याआधी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावे होता. २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियाने ५ विकेट्सच्या मोबदल्यात २४५ धावा केल्या होत्या. शिवम दुबेनं डावातील अखेरच्या चेंडूवर मारलेल्या षटकारासह एका डावात सर्वाधिक २३ षटकार मारत टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेच्या विश्वविक्रमाचीही बरोबरी केली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
इशान किशनचं शानदार शतक; सूर्याची कडक अर्धशतकी खेळी
नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना अभिषेक शर्मानं आपल्या अंदाजात टीम इंडियाला धमाकेदार सुरुवात करून दिली. पण ३१ धावांवर संजू सॅमसनच्या रुपात टीम इंडियाला पहिला धक्का बसला. १६ चेंडूत ३० धावांची खेळी करत अभिषेक शर्माही तंबूत परतला. सलामीवीर माघारी फिरल्यावर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि इशान किशन जोडी जमली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ५७ चेंडूत १३७ धावांची दमदार भागीदारी रचली. सूर्यकुमार यादवनं ३० चेंडूत ४ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ६३ धावा केल्या. इशान किशन याने आंतरारष्ट्रीय टी-२० कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. त्याने ४३ चेंडूत ६ चौकार आणि १० षटकारांच्या मदतीने १०३ धावांची खेळी केली.
Ishan Kishan Maiden T20I Century: इशान किशन ऑन मिशन! वादळी खेळीसह ठोकली शानदार सेंच्युरी
फलंदाजी वेळी हार्दिक पांड्याचाही जलवा
सूर्या आणि इशान ही जोडी तंबूत परतल्यावर अखेरच्या षटकात हार्दिक पांड्याचा जलवा पाहायला मिळाला. त्याने १७ चेंडूत १ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने २४७.०६ च्या स्ट्राइक रेटनं ४२ धावांची धमाकेदार खेळी केली. शिवम दुबेनं २ चेंडूा सामना करताना एक षटकार मारला. त्याच्या षटकारासह भारतीय ंसघाने धावफलकावर ५ विकेट्सच्या मोबदल्यात २७१ धावा लावल्या.