Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs NZ 5th T20I : टी-२० वर्ल्ड कप आधी टीम इंडियाचा महारेकॉर्ड! जे कुणाला जमलं नाही ते करून दाखवलं

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात धावांसह टीम इंडियाने केली विक्रमांची 'बरसात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 00:01 IST

Open in App

 IND vs NZ 5th T20I India Become First Team In World Most Sixes Record : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाचवा टी-२० सामना तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर  खेळवण्यात आला. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना टीम इंडियाच्या फलंदाजांनी तुफान फटकेबाजीचा नजराणा पेश करताना २७१ धावा ठोकल्या.  इशान किशनचे शतक आणि सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकाशिवाय अभिषेक शर्मा आणि हार्दिक पांड्याने स्फोटक फंलदाजी केली. या चौघांच्या कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्ध सर्वोच्च धावसंख्या उभारण्याचा विक्रम रचला. अन्य कोणत्याही संघाला जी कामगिरी करता आली नाही ती टीम इंडियाने ५ विकेट्सच्या मोबदल्यात २७१ धावा करत करुन दाखवली.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!एका सामन्यात सर्वाधिक षटकार

या सामन्यात भारतासाठी इशान किशनने १०, सूर्यकुमार यादवने ६, हार्दिक पांड्याने ४, अभिषेक शर्माने २ आणि शिवम दुबेने १ षटकार मारला.  भारतीय फलंदाजांनी एकूण २३ षटकार ठोकले. यासह टीम इंडियाने फुल मेंबर संघाविरुद्ध एका टी-२० सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा आपलाच विक्रम बरोबरीत आणला. याआधी भारताने २०२४ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २३ षटकार मारले होते.

Ishan Kishan Maiden T20I Century: इशान किशन ऑन मिशन! वादळी खेळीसह ठोकली शानदार सेंच्युरी

एका मालिकेत सर्वाधिक षटकार

न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारताने एकूण ६९ षटकार ठोकले आहेत. यासह, एका टी-२० मालिकेत सर्वाधिक षटकार मारणारा संघ म्हणून भारत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. याआधी हा विक्रम इंग्लंडच्या नावे होता. त्यांनी २०२३ मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध ५ सामन्यांच्या मालिकेत ६४ षटकार लगावले होते. ऑस्ट्रेलिया देखील ६४ षटकारांसह चौथ्या स्थानावर आहे. कांगारुंच्या संघाने २०२५ मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध हा पराक्रम केला होता. पाचव्या स्थानावर कंबोडियाचा संघ आहे, ज्यांनी २०२५ मध्ये इंडोनेशियाविरुद्ध ८ सामन्यांत ६२ षटकार मारले होते.

फुल मेंबर संघाविरुद्ध सर्वाेच्च धावसंख्येचा रेकॉर्ड

न्यूझीलंडविरुद्ध भारताने उभारलेला २७१ धावांचा स्कोर हा फुल मेंबर संघाविरुद्धचा पाचवा सर्वात मोठा टी-२० स्कोर आहे. या यादीत अव्वल स्थानी इंग्लंडचा संघ आहे. त्यांनी २०२५ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अवघ्या २ विकेट्स गमावत ३०४ धावा केल्या होत्या. दुसऱ्या क्रमांकावर भारत असून, त्यांनी २०२४ मध्ये बांगलादेशविरुद्ध २९३ धावा केल्या होत्या. तिसऱ्या क्रमांकावरही भारतच आहे. यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या २८३ धावांच्या कामगिरीचा रेकॉर्ड आहे. चौथ्या स्थानावर अफगाणिस्तानचा संघ आहे, ज्यांनी २०१९ मध्ये आयर्लंडविरुद्ध २७८ धावा केल्या होत्या.

English
हिंदी सारांश
Web Title : India's T20 dominance: Record-breaking sixes against New Zealand before World Cup.

Web Summary : India set a T20I record against New Zealand, smashing 271 runs with 23 sixes, equaling their own record. They also achieved the most sixes (69) in a series, surpassing England. Ishan Kishan's century and explosive batting led India to this milestone.
टॅग्स :न्यूझीलंडचा भारत दौराभारत विरुद्ध न्यूझीलंडभारतीय क्रिकेट संघइशान किशनसूर्यकुमार यादवहार्दिक पांड्या