IND vs IRE 2nd T20I Live Marathi : यशस्वी जैस्वाल आणि तिलक वर्मा झटपट माघारी परतल्यानंतर संजू सॅमसन व ऋतुराज गायकवाड यांनी दमदार फटकेबाजी केली. आयर्लंडच्या गोलंदाजांना या दोघांनी चांगलेच चोपून काढले अन् १२ व्या षटकात फलकावर शतकी धावा चढवल्या.
जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार २ धावांनी विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. आजच्या सामन्यात आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. बुमराहने आजच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताच बदल केलेला नाही. यशस्वी जैस्वाल व ऋतुराज गायकवाड यांनी ३.४ षटकांत २९ धावा चोपून चांगली सुरुवात करून दिली होती, परंतु क्रेग यंगच्या बाऊन्सरवर यशस्वी ( १८) स्क्वेअर लेगला कर्टीस कॅम्फरच्या हाती झेल देऊन माघारी परतला. पहिल्या सामन्यात गोल्डन डकवर गेलेल्या तिलक वर्माने घाई केली आणि चुकीचा फटका मारून १ धावेवर झेलबाद झाला. भारताला ३४ धावांवर २ धक्के बसले.