आयपीएल 'स्टार' चमकले! ऋतुराज, संजू, रिंकू, शिवम यांनी आयर्लंडला आसमान दाखवले 

IND vs IRE 2nd T20I Live Marathi : ऋतुराज गायकवाडने आशियाई स्पर्धेपूर्वी खणखणीत अर्धशतक झळकावले आणि संजू सॅमसने आशिया चषकापूर्वी फॉर्म मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2023 09:11 PM2023-08-20T21:11:09+5:302023-08-20T21:12:27+5:30

whatsapp join usJoin us
IND vs IRE 2nd T20I Live Marathi : Ruturaj Gaikwad ( 58), Sanju Samson ( 40), rinku singh ( 38) & shivam dube ( 22*) smashed fours-sixes; India 185/5 | आयपीएल 'स्टार' चमकले! ऋतुराज, संजू, रिंकू, शिवम यांनी आयर्लंडला आसमान दाखवले 

आयपीएल 'स्टार' चमकले! ऋतुराज, संजू, रिंकू, शिवम यांनी आयर्लंडला आसमान दाखवले 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs IRE 2nd T20I Live Marathi : ऋतुराज गायकवाडने आशियाई स्पर्धेपूर्वी खणखणीत अर्धशतक झळकावले आणि संजू सॅमसने आशिया चषकापूर्वी फॉर्म मिळवला. ऋतुराज व संजूने भारताला दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात पुनरागमन करून दिले. यशस्वी जैस्वाल व तिलक वर्मा आज पुन्हा फेल गेले. रिंकू सिंग व तिलक वर्मा यांनी अखेरच्या षटकांत चांगली फटकेबाजी करून आयर्लंडसमोर तगडे लक्ष्य उभे केले. 


यशस्वी जैस्वाल (१८) आणि तिलक वर्मा ( १) माघारी परतल्यानंतर संजू सॅमसनऋतुराज गायकवाड यांनी दमदार फटकेबाजी केली. आयर्लंडच्या गोलंदाजांना या दोघांनी चांगलेच चोपून काढले अन् १२ व्या षटकात फलकावर शतकी धावा चढवल्या. संजूने १२व्या षटकात जोशुआ लिटलची ४,४,४,०,६ अशी धुलाई केली. पण, १३व्या षटकात बेन व्हाईटने टाकलेला चेंडू बॅटची किनार घेत यष्टींवर आदळला अन् संजूला ४० धावांवर ( २६ चेंडू, ५ चौकार व १ षटकार) माघारी जावे लागले. ऋतुराजसह त्याने ४९ चेंडूंत ७१ धावांची भागीदारी केली. ऋतुराजने ३९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर पुढचाच चेंडू ऋतूने स्टेडियमबाहेर पाठवला.. ( संजू सॅमसनची फटकेबाजीचा Video


अखेरच्या ५ षटकांत ऋतुराज धावांचा वेग असाच वाढवेल असे वाटत असताना मॅकार्थीने त्याला माघारी पाठवले. ऋतुराज ४३ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह ५८ धावांवर झेलबाद झाला. ऋतुराजच्या विकेटनंतर पुढील १२ चेंडूंत शिवम दुबे व रिंकू सिंग यांना मोठे फटके मारता आले नाही. आयर्लंडकडून जोश लिटल ( ४८) महागडा ठरला, तर क्रेग यंग ( १-२९) व बेन व्हाइट ( १-३३) यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. रिंकूने अखेरच्या दोन षटकांत चांगले फटके मारले. त्याने आयर्लंडचा यशस्वी गोलंदाज बॅरी मॅकार्थीच्या षटकात २२ धावा चोपल्या. शिवमने २०व्या षटकाची सुरूवात सलग दोन षटकारांनी केली. रिंकू २१ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांसह ३८ धावांवर बाद झाला. त्याने शिवमसह २८ चेंडूंत ५५ धावा जोडल्या. शिवम २२ धावांवर नाबाद राहिला आणि भारताने ५ बाद १८५ धावा केल्या.

 

Web Title: IND vs IRE 2nd T20I Live Marathi : Ruturaj Gaikwad ( 58), Sanju Samson ( 40), rinku singh ( 38) & shivam dube ( 22*) smashed fours-sixes; India 185/5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.