Join us

भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

2 India Teams for England Tour, IND vs ENG Test 2025: २ सामन्यांसाठी २ वेगवेगळ्या भारतीय संघाची लवकरच निवड होऊ शकते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 17:21 IST

Open in App

2 India Teams for England Tour, IND vs ENG Test 2025: भारतीय क्रिकेट संघाला IPL 2025 नंतर इंग्लंडचा दौरा करायचा आहे. भारत-इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेपूर्वी भारत अ संघ इंग्लंड लायन्सविरुद्ध दोन सामन्यांची मालिका खेळेल. २ अनधिकृत कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची लवकरच निवड होऊ शकते. अजित आगरकरने १४ सदस्यीय भारत अ संघाची निवड केल्याचे वृत्त आहे. मोठी बातमी अशी आहे की, दोन्ही सामन्यांसाठी दोन वेगवेगळे संघ निवडले जाण्याची शक्यता आहे. इंडिया अ आणि इंग्लंड लायन्स ३० मे पासून त्यांचा पहिला सामना खेळतील. पहिल्या सामन्यात कोणते खेळाडू स्थान मिळवणार आहेत? त्याबद्दल अंदाज वर्तवला जात आहे.

यशस्वी जैस्वाल इंग्लंडला जाणार...

राजस्थान रॉयल्सची IPL 2025 मध्ये कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. राजस्थानचा संघ आधीच बाहेर पडला आहे. त्यामुळे त्यांचा सलामीवीर यशस्वी जैस्वालला पहिल्या सामन्यासाठी इंग्लंडला पाठवले जाईल हे जवळपास निश्चित आहे. त्याशिवाय, सनरायजर्स हैदराबाद संघही स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्यांच्या संघाची सुरुवात खूप चांगली झाली होती. इशान किशन एक धडाकेबाज शतकही ठोकले होते. पण नंतर मात्र त्यांच्या संघाला विजयी लय कायम राखता आली नाही. त्यामुळे त्यांचा संघही प्लेऑफच्या शर्यतीतून बाद झाला. अशा परिस्थितीत, इंडिया अ संघासोबत तो देखील इंग्लंडला जाईल. ध्रुव जुरेल आणि इशान किशन दोघेही या संघात असतील.

ठाकूर परतला, ईश्वरनवर नजर

शार्दुल ठाकूरचे टीम इंडियामध्ये पुनरागमन निश्चित मानले जात आहे. म्हणूनच त्याला इंडिया अ संघासोबत इंग्लंडला पाठवले जाईल. बंगालचा सलामीवीर अभिमन्यू ईश्वरन आणि नितीश रेड्डी यांचीही इंडिया अ संघासाठी निवड होणे जवळपास निश्चित आहे. हरयाणाचा वेगवान गोलंदाज अंशुल कंबोज देखील इंग्लंडला जाऊ शकतो. याशिवाय करुण नायर देखील इंग्लंडला जाणार आहे.

सरफराज खान इंडिया अ संघात नाही

आश्चर्याची गोष्ट म्हणजे सरफराज खान इंडिया अ संघासोबत इंग्लंडला जाणार नाही, पण त्याची टीम इंडियामध्ये निवड होऊ शकते. शुभमन गिल, प्रसिद्ध कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार हे देखील इंडिया अ च्या दुसऱ्या सामन्यासाठी संघात सामील होतील.

भारत अ चा संभाव्य संघ- यशस्वी जैस्वाल, इशान किशन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, अभिमन्यू इसवरन, ध्रुव जुरेल, शार्दुल ठाकूर, तनुष कोटियन, मुकेश कुमार, आकाश दीप, खलील अहमद, अंशुल कंबोज आणि मानव सुथार.

टॅग्स :भारत विरूद्ध इंग्लंड २०२५अजित आगरकरगौतम गंभीरभारतीय क्रिकेट संघ