मँचेस्टर : भारताचा कर्णधार शुभमन गिल याला कदाचित अंतिम संघात शार्दुल ठाकूर नाही, तर कुलदीप यादवला खेळवायचे होते. पण, गिलला निवडीत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता, असे दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी म्हटले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मुख्य प्रशिक्षकांसह इतरांचा त्यावर प्रभाव नको
गावसकर म्हणाले की, संघनिवडीचा निर्णय पूर्णपणे कर्णधाराचा असायला हवा. मुख्य प्रशिक्षकांसह इतरांचा त्यावर प्रभाव असू नये.डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवची संघात निवड न झाल्याने सातत्याने जोरदार वाद सुरू झाले आहेत. विशेषतः जो रूटने चौथ्या कसोटीत विक्रमी शतक झळकावल्यानंतर जेथे तो रिकी पॉन्टिंगला मागे टाकून कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला.
IND vs ENG : टीम इंडियाकडून चौघांनी केली कमाल; कसोटी इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं रूटला दोनदा बाद करुनही कुलदीप एकाही सामन्यात संधी नाही
गावसकर म्हणाले की, अखेर हा कर्णधाराचा संघ असतो. गिलला कदाचित शार्दुल संघात नको होता आणि कुलदीप हवा होता. रूटला २०१८मध्ये मँचेस्टर आणि लॉईस येथे दोन मर्यादित षटकांच्या सामन्यांत दोनदा बाद केल्यानंतरही कुलदीपला आतापर्यंत संपूर्ण कसोटी मालिकेत बाहेर ठेवण्यात आले आहे. हेडिंग्ले कसोटीत भारताने ३ बाद ४३० धावा काढल्यानंतर आणि पुढील ११ षटकांत ४७१ धावांवर गारद झाल्यानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी फलंदाजीतून योगदान देऊ शकणाऱ्या गोलंदाजांवर भर दिला आहे, अशी सर्वसाधारण भावना आहे. गावसकर यांचा असा विश्वास होता की, कुलदीप अंतिम संघाचा भाग असायला हवा होता. ते म्हणाले की, त्याला संघात कुलदीप मिळायला हवा होता. तो कर्णधार आहे. लोक त्याच्याबद्दल आणि त्याच्या कर्णधारपदाबद्दल बोलतील. त्यामुळे हा निर्णय गिलचाच असायला हवा.
कर्णधाराचीच जबाबदारी अंतिम
माजी भारतीय कर्णधाराचा असाही विश्वास होता की, ड्रेसिंग रूममध्ये सर्व काही ठीक आहे हे दाखविण्यासाठी अंतर्गत मतभेद किंवा निवडीचे मुद्दे जाणूनबुजून लपवले जाऊ शकतात. गावसकर म्हणाले की, मला माहीत आहे की, सर्व काही ठीक आहे हे दाखविण्यासाठी या गोष्टी बाहेर येऊ शकत नाहीत. सत्य हे आहे की कर्णधार जबाबदार आहे. तो अंतिम अकरा संघाचे नेतृत्व करेल. ही एक सामान्य गोष्ट आहे.
सध्याचे संयोजन समजणे कठीण
गावसकर म्हणाले की, आमच्या काळात परिस्थिती वेगळी होती. तेव्हा संघनिवड हा पूर्णपणे कर्णधाराचा विशेषाधिकार होता आणि प्रशिक्षकाची संकल्पना अस्तित्वात नव्हती. आमच्याकडे फक्त माजी खेळाडू संघ व्यवस्थापक किंवा सहायक व्यवस्थापक होते. ते असे लोक होते ज्यांच्याशी तुम्ही जाऊन बोलू शकत होता, ते तुम्हाला जेवणाच्या वेळी, दिवसाच्या खेळाच्या शेवटी किंवा सामन्याच्या पूर्वसंध्येला सल्ला देत असत. म्हणून सध्याचे कर्णधार आणि प्रशिक्षक यांचे संयोजन समजून घेणे माझ्यासाठी कठीण आहे. मी कर्णधार असताना आमच्याकडे कोणतेही माजी खेळाडू नव्हते.