भारत- इंग्लंड यांच्यात अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीसाठी सुरु असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना लंडन येथील लॉर्ड्सच्या मैदानात रंगला आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने एजबॅस्टनच्या मैदानातील ऐतिहासिक विजयासह लीड्सच्या मैदानातील पराभावची परतफेड करत ५ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. शुबमन गिलनं बर्मिंगहॅमच्या मैदानात कसोटी कर्णधाराच्या रुपात विजयाचे खाते उघडले. पण तिसऱ्या सामन्यात टॉस जिंकण्यात तो पुन्हा अपयशी ठरला. टॉस वेळी सलग तिसऱ्यांदा त्याच्या पदरी निराशा आली. यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाच्या नावे क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात मिळून सलग सर्वाधिक वेळा टॉस गमावण्याचा नकोसा विक्रम नोंदवला गेलाय.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
...अन् भारतीय संघाच्या नावे झाला सर्वाधिक वेळा टॉस गमावण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड शुबमन गिलनं लॉर्ड्सच्या मैदानातील सामन्यात टॉस गमावताच टीम इंडियाच्या नावे आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही प्रकारात मिळून सर्वाधिक वेळा टॉस गमावण्याचा नकोसा वर्ल्ड नावे झाला आहे. ३१ जानेवारी २०२५ ते १० जुलै २०२५ या कालावधीत भारतीय संघाने टी-२०, वनडे आणि कसोटीत मिळून सलग १३ वेळा टॉस गमावला आहे. याआधी हा रेकॉर्ड वेस्ट इंडिजच्या नावे होता. कॅरेबियन संघाने २ फेब्रुवारी १९९९ ते २१ एप्रिल १९९९ या कालावधीत सलग १२ वेळा टॉस गमावला होता.
IND vs ENG : बुमराहच्या गोलंदाजीवर टीम इंडियालाच बसला धक्का; पंत 'आउट'! नेमकं काय घडलंं?
रोहित शर्मानं सर्वाधिक ८ वेळा गमालाय टॉस
भारतीय संघाचे नेतृत्व करताना वनडे आणि कसोटीत रोहित शर्मानं सलग ८ वेळा टॉस गमावला असून सूर्यकुमार यादवनं २ वेळा आणि शुबमन गिलवर सलग ३ वेळा टॉस गमावण्याची वेळ आली आहे. या तिघांच्या नेतृत्वाखालील मिळून टीम इंडियाने सर्वाधिक वेळा टॉस गमावला आहे.
संघ | किती वेळा टॉस गमावला | कर्णधार | ||
भारत | १३* | ३१ जानेवारी ते १० जुलै २०२५ | रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि शुबमन गिल | |
वेस्ट इंडिज | १२ | २ फेब्रुवारी १९९९ ते २१ एप्रिल १९९९ | जेम्स अडम्स, ब्रायन लारा आणि कार्ल हुपर | |
इंग्लंड | ११ | १७ डिसेंबर २०२२ ते १२ मार्च २०२३ | जोस बटलर आणि बेन स्टोक्स | |
न्यूझीलंड | १० | १६ फेब्रुवारी १९७२ ते ७ जून १९७३ | बेव्हन कॉंगडॉ, ग्रॅहाम डाउलिंग |