Join us

एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला मालिकावीरचा पुरस्कार

हॅरी ब्रूकला सामनावीर पुरस्कार मिळण्यामागे कसा आहे गंभीरचा हात त्यासंदर्भातील सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 21:46 IST

Open in App

IND vs ENG, Shubman Gill And Harry Brook Player Of The Series Award : भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी स्पर्धेतील पाचवा आणि अखेरचा सामना रंगतदार झाला. पाचव्या दिवसाच्या खेळात टीम इंडियाने ६ धावांनी रोमहर्षक विजय मिळवत मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली. या मालिकेत पहिल्यांदाच भारतीय संघाचे नेतृत्व करताना शुबमन गिलनं फलंदाजीतील कतृत्व दाखवून देताना ७५२ धावा काढल्या. ४ शतकांसह धावांची बरसात करणाऱ्या कर्णधाराला मालिकावीर पुरस्कार मिळणार हे पक्क होतं. पण ओव्हलच्या कसोटी सामन्यानंतर हॅरी ब्रूकलाही मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. इथं जाणून घेऊयात एका मालिकेत दोघांना कसा काय दिला गेला हा पुरस्कार अन् हॅरी ब्रूकला सामनावीर पुरस्कार मिळण्यामागे कसा आहे गंभीरचा हात त्यासंदर्भातील सविस्तर

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

एक मालिका अन् दोन मालिकावीर! अशीच आहे तिथली परंपरा

इंग्लंडमधील कसोटी मालिकेत काही खास परंपरा जपल्या जातात. एका मालिकेत दोन्ही संघातील खेळाडूंना मालिकावीर  या पुरस्कार देण्याची परंपराही अनेक वर्षांपासून चालत आली आहे. मालिकेत छाप सोडणाऱ्या एकाला मालिकावीर पुरस्कार प्रदान न करता इथं दोन्ही संघातील सर्वोत्तम खेळाडूची मालिकावीर म्हणून निवड केली जाते. भारतीय संघाकडून शुबमन गिलनं सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याला हा पुरस्कार मिळणार हे पक्के होते. पण हॅरी ब्रूक हा मालिकेत इंग्लंडकडून सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज असून त्याला हा पुरस्कार मिळाला. कारण त्याच्या निवडीवर गंभीरनं शिक्कामोर्तब केला होता.

गंभीरमुळं हॅरी ब्रूकला मिळाला मालिकावीरचा पुरस्कार

मालिकावीर कोण याची निवड ही दोन्ही संघातील प्रशिक्षकावर ठरवली जाते. इंग्लंडचे प्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलम यांनी शुबमन गिलच्या नावावर तर भारताचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी हॅरी ब्रूकच्या नावाला पसंती दिली होती. त्यामुळे इंग्लंडकडून  जो रुटनं ५ सामन्यातील ९ डावात ५३७ धावा  करूनही  २ शतकाच्या मदतीने ४८१ धावा करणाऱ्या ब्रूकला हा मालिकावीर पुरस्कार मिळाला. 

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५भारत विरुद्ध इंग्लंडशुभमन गिलगौतम गंभीरभारतीय क्रिकेट संघ