Join us

"नजर हटी दुर्घटना घटी"; पार्टनरकडे ध्यान नाही, अय्यर सुसाट सुटला अन् 'बॅक टू बॅक फिफ्टी'ला मुकला

तो बॅक टू बॅक फिफ्टीच्या अगदी उंबरठ्यावर पोहचला होता. पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 21:39 IST

Open in App

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कटकच्या मैदानात रंगलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही भारतीय बॅटर्संनी धमाकेदार शो दाखवला. शुबमन गिलचं अर्धशतक आणि रोहित शर्माच्या शतकामुळे सामना भारताच्या बाजूनं सेट झाला. सलामीवीर जोडी आपलं काम करून तंबूत परतल्यावर मैदानात उतरलेल्या श्रेयस अय्यरनं कटकवरही कडक खेळी केली. तो बॅक टू बॅक फिफ्टीच्या अगदी उंबरठ्यावर पोहचला होता.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

"नजर हटी दुर्घटना घटी" अय्यर रन आउट होऊन परतला तंबूत

 पण अक्षर पटेलसोबत त्याचा ताळमेळ ढासळला अन् त्याला आपल्या विकेट्सच्या रुपात मोठी किंमत मोजावी लागली. एक धाव घेतल्यावर तो दुसऱ्या धावेसाठी बाहेर पडला. स्ट्राइक एन्डला पोहचलला अक्षर पटेलनं त्याला धाव होत नाही असा कॉल केला होता. पण श्रेयस अय्यरचं आपल्या पार्टनरकडे लक्षच नव्हते. त्यामुळे  "नजर हटी दुर्घटना घटी" या सीनसह त्याची इनिंग अर्धशतकाआधीच संपली. भारताच्या डावातील ३७ व्या षटकात तो श्रेयय अय्यर रन आउट झाला. त्याने ४७ चेंडूत ३ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४४ धावांची खेळी केली. इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात सलग दुसरे अर्धशतक झळकावण्याची त्याच्याकडे संधी होती. पण तो या संधीला मुकला. 

पहिल्या वनडेत धमाकेदार शो!

नागपूरच्या वनडे सामन्यात विराट कोहली अनफिट असल्यामुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली होती. या सामन्यात त्याने संघ अडचणीत असताना आक्रमक अंदाजात बॅटिंग करत प्रतिस्पर्धी संघाला बॅकफूटवर ढकलणारी खेळी केली होती. या सामनयात ३६ चेंडूत त्याने ९ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५९ धावांची खेळी केली होती. या खेळीनंतर पुन्हा एकदा त्याला अर्धशतकाची संधी होती. ही सधी हुकली असली तरी कटकमधील कडक खेळीसह चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याने प्लेइंग इलेव्हनमधील आपले स्थान जवळपास पक्के केले आहे. 

टॅग्स :श्रेयस अय्यरअक्षर पटेलभारत विरूद्ध इंग्लंड २०२५भारत विरुद्ध इंग्लंडभारतीय क्रिकेट संघ