भारत आणि इंग्लंड यांच्यातील कटकच्या मैदानात रंगलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही भारतीय बॅटर्संनी धमाकेदार शो दाखवला. शुबमन गिलचं अर्धशतक आणि रोहित शर्माच्या शतकामुळे सामना भारताच्या बाजूनं सेट झाला. सलामीवीर जोडी आपलं काम करून तंबूत परतल्यावर मैदानात उतरलेल्या श्रेयस अय्यरनं कटकवरही कडक खेळी केली. तो बॅक टू बॅक फिफ्टीच्या अगदी उंबरठ्यावर पोहचला होता.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
"नजर हटी दुर्घटना घटी" अय्यर रन आउट होऊन परतला तंबूत
पण अक्षर पटेलसोबत त्याचा ताळमेळ ढासळला अन् त्याला आपल्या विकेट्सच्या रुपात मोठी किंमत मोजावी लागली. एक धाव घेतल्यावर तो दुसऱ्या धावेसाठी बाहेर पडला. स्ट्राइक एन्डला पोहचलला अक्षर पटेलनं त्याला धाव होत नाही असा कॉल केला होता. पण श्रेयस अय्यरचं आपल्या पार्टनरकडे लक्षच नव्हते. त्यामुळे "नजर हटी दुर्घटना घटी" या सीनसह त्याची इनिंग अर्धशतकाआधीच संपली. भारताच्या डावातील ३७ व्या षटकात तो श्रेयय अय्यर रन आउट झाला. त्याने ४७ चेंडूत ३ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४४ धावांची खेळी केली. इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात सलग दुसरे अर्धशतक झळकावण्याची त्याच्याकडे संधी होती. पण तो या संधीला मुकला.
पहिल्या वनडेत धमाकेदार शो!
नागपूरच्या वनडे सामन्यात विराट कोहली अनफिट असल्यामुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली होती. या सामन्यात त्याने संघ अडचणीत असताना आक्रमक अंदाजात बॅटिंग करत प्रतिस्पर्धी संघाला बॅकफूटवर ढकलणारी खेळी केली होती. या सामनयात ३६ चेंडूत त्याने ९ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५९ धावांची खेळी केली होती. या खेळीनंतर पुन्हा एकदा त्याला अर्धशतकाची संधी होती. ही सधी हुकली असली तरी कटकमधील कडक खेळीसह चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याने प्लेइंग इलेव्हनमधील आपले स्थान जवळपास पक्के केले आहे.
Web Title: IND vs ENG 2nd ODI A Terrible Mix Up With Axar Patel And Shreyas Iyer Pays The Price Run out Miss Deserved Fifty
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.