Big News : भारतीय संघाला बसला सर्वात मोठा धक्का; इंग्लंडकडून पराभव महागात पडला 

इंग्लंडने विजयासाठी ठेवलेल्या २३१ धावांच्या प्रत्युत्तरात भारताचा दुसरा डाव २०२ धावांवर गडगडला. या पराभवाचा भारतीय संघाला आणखी एक मोठा फटका बसला. 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2024 08:04 PM2024-01-28T20:04:23+5:302024-01-28T20:06:21+5:30

whatsapp join usJoin us
ind vs Eng 1st test match : India slips to 5th in the points table in WTC 2023-25. | Big News : भारतीय संघाला बसला सर्वात मोठा धक्का; इंग्लंडकडून पराभव महागात पडला 

Big News : भारतीय संघाला बसला सर्वात मोठा धक्का; इंग्लंडकडून पराभव महागात पडला 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India Vs England 1st Test match Day 4 Live Scorecard : इंग्लंडने रविवारी हैदराबाद येथे भारतीय संघावर २८ धावांनी विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. इंग्लंडने विजयासाठी ठेवलेल्या २३१ धावांच्या प्रत्युत्तरात भारताचा दुसरा डाव २०२ धावांवर गडगडला. या पराभवाचा भारतीय संघाला आणखी एक मोठा फटका बसला. 


मागील १२ वर्षांत प्रथमच भारताला घरच्या मैदानावर सलग तीन कसोटीत विजय मिळवता आला नाही. यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत १ पराभव व १ ड्रॉ असा निकाल लागला होता. भारताने इंग्लंडचा पहिला डाव २४६ धावांत गुंडाळून ४३६ धावा करताना १९० धावांची आघाडी घेतली. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात ५ फलंदाज १६३ धावांवर तंबूत परतले होते, परंतु ऑली पोपच्या १९६ धावांनी संघाला ४२० धावांपर्यंत पोहोचवले.


२३१ धावाचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाला टॉम हार्टलीने ७ धक्के दिले. इंग्लंडकडून पदार्पणाच्या कसोटीत सर्वोत्तम कामगिरी करताना तो तिसरा फिरकीपटू ठरला. त्याने या कसोटीत १९३ धावा देताना ९ विकेट्स घेतल्या आणि जिम लेकर यांचा १९४८सालचा ( ९ बाद १९८ धावा वि. वेस्ट इंडिज) विक्रम मोडला. भारतासाठी दुसऱ्या डावात रोहित शर्माने सर्वाधिक ३९ धावा केल्या. श्रीकर भारत व आर अश्विन यांनी प्रत्येकी २८ धावा करून भारताच्या आशा जीवंत राखण्याचा प्रयत्न केला होता.

भारताला बसला खूप मोठा धक्का...
इंग्लंडचा सध्याच्या जागतिक कसोटी अजिंक्यपप स्पर्धेच्या सायकलमधील तिसरा विजय आहे.  या पराभवासह भारताची गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. ॲशेस मालिकेदरम्यान स्लो ओव्हर-रेटमुळे १९ गुण गमावल्यानंतर इंग्लंडचा हा तिसरा विजय असूनही ते क्रमवारीत ८ व्या क्रमांकावर आहेत.  या मालिकेत पुनरागमन करण्यासाठी आणि WTC टेबलवर परत येण्यासाठी टीम इंडियासमोर अजून चार कसोटी बाकी आहेत.  


 

Web Title: ind vs Eng 1st test match : India slips to 5th in the points table in WTC 2023-25.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.