Riyan Parag Tries Controversial Action IND vs BAN 2nd T20I : दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर रंगलेल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशचा बुक्का पाडला. कसोटी मालिके पाठोपाठ नव्या टीम इंडियाने बांगलादेश विरुद्धची ३ सामन्यांची टी-२० मालिका २-० अशी खिशात घातली. या सामन्यात भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवनं ७ गोलंदाजांचा वापर केला. प्रत्येक गोलंदाजानं किमान एक विकेटही मिळवली. ज्यात रियान परागचाही समावेश होता.
भर मैदानात नौटंकी केली अन् फजिती झाली
पण रियान पराग त्याने घेतलेल्या विकेटशिवाय त्याच्या गोलंदाजी शैलीमुळे चर्चेत आला आहे. रियान परागचा अजब गजब शैलीत गोलंदाजी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. ज्यामुळे मैदानात त्याची फजिती झाल्याचेही पाहायला मिळाले.
रियान परागमध्ये संचारला मलिंगा, पण..
रियान परागच्या हाती चेंडू आला की, कधी तो मलिंग होतो तर कधी आणखी कोणती तरी नवी शैली दाखवून देत फलंदाजाला हैराण करून सोडतो. पण यावेळी जे घडलं ते त्याच्यासह त्याच्या चाहत्यांना हैराण करून सोडणारं होते. फलंदाजाला चकवा देण्यासाठी दुसऱ्या टी-२० सामन्यात रियान पराग क्रिजच्या बाहेरून गोलंदाजी करताना दिसून आले. ज्यामुळे मैदानातील पंचांनी त्याला शिक्षाही दिली.
नेमकं काय घडलं?
बांगलादेश संघाच्या डावातील ११ व्या षटकात भारताकडून रियान पराग गोलंदाजीसाठी आला. या षटकात त्याने हटके शैलीत गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. जो त्याच्यासह संघासाठी महागडा ठरला.रियान परागनं मलिंगाच्या स्टाईलमध्ये गोलंदाजी करत महमूदुल्लाहला सरप्राइज देण्याचा प्लान आखला होता. पण यात तोच जाळ्यात अडकला. क्रिज बाहेरून बॉलिंग टाकल्यामुळे पंचांनी नियमानुसार, त्याचा चेंडू नो बॉल ठरवला. ही गोष्ट 'नौटंकी महागात पडली अन् भर मैदानात फजिती झाली' अशीच काहीशी होती.
कशी होती रियान परागची कामगिरी?
बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात रियान पराग सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. २ षटकाराच्या मदतीने ६ चेंडूत १५ धावांची खेळी करत तो माघारी फिरला गोलंदाजीवेळी त्याला दोन ओव्हर टाकण्याची संधी मिळाली. यात त्याने १६ धावा खर्च करून त्याने मेहिदी हसन मिराझच्या रुपात एक विकेटही घेतली. पण वादग्रस्त गोलंदाजी शैलीमुळे त्याची फजिती झाली.