IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं

पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना त्याने नशीब काढलं, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 20:22 IST2025-09-24T20:17:03+5:302025-09-24T20:22:05+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IND vs BAN Super Fours 16th Match Bangladesh New Captain Jaker Ali Won Toss And Opt To Bowl Suryakumar Yadav Happy To Bat First | IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं

IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील सुपर फोरमधील लढत दुबई येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगली आहे. या सामन्याआधी बांगलादेशच्या संघाला मोठा धक्का बसला. नियमित कर्णधार लिटन दास दुखापतीमुळे प्लेइंग इलेव्हनमधून आउट झाला आहे. त्याच्या अनुपस्थितीत जाकेर अली संघाचे नेतृत्व करत आहे. याआधी त्याने कधीच टी-२० संघाचे नेतृत्व केलेले नाही. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना त्याने नशीब काढलं, पण...

टीम इंडियाविरुद्ध पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना त्याने नशीब काढलं. कारण त्याने टॉस जिंकला. कौल आपल्या बाजूनं लागल्यानंतर जाकेर अली याने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लिटन दाससह चार बदलांसह मैदानात उतरल्याचेही त्याने स्पष्ट केले. पण चार खेळाडूंची नाव  त्याला सांगता आली नाही. ओमान विरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणता बदल केलाय ते नाव विसरल्याचे पाहायला मिळाले होते. तसेच काहीसे बांगालादेशच्या नव्या कर्णधाराबद्दल घडलं.  

"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

आम्हाला तेच हवं होत, टॉस गमावल्यावर सूर्याची प्रतिक्रिया

सूर्यकुमार यादव याने टॉस गमावला. पण आम्ही पहिल्यांदा फलंदाजी करणार होतो, असे म्हणत त्याने बांगलादेशच्या कर्णधारानं आपल्या मनासारखं केल्याची गोष्टच बोलून दाखवली. याशिवाय भारतीय संघ कोणत्याही बदलाशिवाय मैदानात उतरणार असल्याची गोष्ट स्पष्ट केली. 

भारताची प्लेइंग इलेव्हन

अभिषेक शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती

बांगलादेश प्लेइंग इलेव्हन 

 सैफ हसन, तन्झिद हसन तमीम, परवेझ हुसेन इमोन, तौहीद ह्रदोय, शमीम हुसेन, जाकेर अली (कर्णधार/यष्टीरक्षक, मोहम्मद सैफुद्दीन, रिशाद हुसेन, तंझिम हसन साकिब, नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान. 
 

Web Title : बांग्लादेशी कप्तान का भाग्य फिसला; टॉस के नतीजे से सूर्या खुश।

Web Summary : बांग्लादेश के नए कप्तान जाकेर अली ने टॉस जीता लेकिन अपनी टीम का नाम बताने में संघर्ष किया। सूर्यकुमार यादव के अनुसार, भारत वैसे भी पहले बल्लेबाजी करना चाहता था। भारत अपरिवर्तित है, जबकि बांग्लादेश ने लिट्टन दास की चोट के कारण चार बदलाव किए।

Web Title : Bangladesh captain's luck falters; Surya happy with toss outcome.

Web Summary : Bangladesh's new captain, Jaker Ali, won the toss but struggled to name his team. India wanted to bat first anyway, according to Suryakumar Yadav. India remains unchanged, while Bangladesh made four changes due to Litton Das's injury.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.