IND vs BAN : हरमनप्रीत कौरचा नकोसा विक्रम, रोहित शर्माला टाकले मागे; भारत शंभरीच्या आत गडगडला

IND vs BAN 2nd T20I : बांगलादेशविरुद्ध पहिल्या ट्वेंटी-२०त विजय मिळवणाऱ्या भारतीय महिला संघाला दुसऱ्या सामन्यात अतिआत्मविश्वास नडला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 03:05 PM2023-07-11T15:05:43+5:302023-07-11T15:06:18+5:30

whatsapp join usJoin us
IND vs BAN : Harmanpreet Kaur is the first Indian captain to get out for a golden duck against Bangladesh in T20Is (men/women, senior/junior), Bangladesh as they restrict India to 95/8. | IND vs BAN : हरमनप्रीत कौरचा नकोसा विक्रम, रोहित शर्माला टाकले मागे; भारत शंभरीच्या आत गडगडला

IND vs BAN : हरमनप्रीत कौरचा नकोसा विक्रम, रोहित शर्माला टाकले मागे; भारत शंभरीच्या आत गडगडला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs BAN 2nd T20I : बांगलादेशविरुद्ध पहिल्या ट्वेंटी-२०त विजय मिळवणाऱ्या भारतीय महिला संघाला दुसऱ्या सामन्यात अतिआत्मविश्वास नडला. स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी सुरुवात तर चांगली केली, परंतु त्यानंतर बांगलादेशच्या गोलंदाजांनी पटापट विकेट्स घेतल्या. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने ( Harmanpreet Kaur ) पहिल्या सामन्यात मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार जिंकून ट्वेंटी-२०त सर्वाधिकवेळा हा पुरस्कार जिंकणाऱ्या भारतीय कर्णधारांमध्ये ( पुरुष व महिला) रोहित शर्माला मागे टाकले होते. आजही हरमनप्रीतने विक्रम नोंदवला अन् रोहितला मागे टाकले, परंतु हा विक्रम नकोसा होता. 


स्मृती मानधना ( १३) व शेफाली ( १९) या दोघी फलकावर ३३ धावा असताना माघारी परतल्या. शेफालीची विकेट घेणाऱ्या सुल्ताना खातूनने पहिल्याच चेंडूवर हरमनप्रीतचा त्रिफळा उडवला. यास्तिका भाटीया ( ११), दीप्ती शर्मा ( १०) व अमनज्योत कौर ( १४) वगळल्यास भारताच्या अन्य फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. भारताला ८ बाद ९५ धावांवर समाधान मानावे लागले. खातूनने ३, फहिमा खातूनने २ विकेट्स घेतल्या. बांगलादेशविरुद्ध ट्वेंटी-२०त  गोल्डन डकवर बाद होणारी हरमनप्रीत ही दुसरी भारतीय महिला खेळाडू ठरली. यापूर्वी २०२२ मध्ये किरण नरगिरे गोल्डन डकवर बाद झाली होती.  


ट्वेंटी-२० सर्वाधिक ३ वेळा गोल्डन डकवर बाद होणाऱ्या भारतीय कर्णधाराचा नकोसा विक्रम हरमनप्रीतच्या नावावर नोंदवला गेलाय. झुलन गोस्वामी, मिताली राज, शिखर धवन, रोहित शर्मा हे प्रत्येकी १ वेळा पहिल्याच चेंडूवर बाद झालेत. बांगलादेशविरुद्ध T20I मध्ये पहिल्याच चेंडूवर होणारी ती पहिलीच भारतीय कर्णधार ( पुरुष व महिला/ सीनियर व ज्युनियर) ठरली आहे. 


Web Title: IND vs BAN : Harmanpreet Kaur is the first Indian captain to get out for a golden duck against Bangladesh in T20Is (men/women, senior/junior), Bangladesh as they restrict India to 95/8.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.