Join us

पहिल्या T20 आधी बांगलादेशच्या संघात घबराट? मशिदीत न जाता 'या' ठिकाणी केलं नमाज पठण

Bangladesh Team Namaz, IND vs BAN 1st T20: उद्या ग्वाल्हेरच्या मैदानात रंगणार भारत आणि बांगलादेश यांच्यात पहिला टी२० सामना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 16:40 IST

Open in App

Bangladesh Team Namaz, IND vs BAN 1st T20: भारत आणि बांगलादेश यांच्यात ६ ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची टी२० मालिका सुरू होत आहे. दोन्ही संघांमधील मालिकेतील पहिला सामना ग्वाल्हेरच्या न्यू माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. मात्र ग्वाल्हेरमध्ये बांगलादेशी संघाचा विरोध होत आहे. ऑगस्टमध्ये शेख हसीना सरकार पडल्यानंतर बांगलादेशमध्ये हिंदूंवर झालेल्या कथित अत्याचाराच्या निषेधार्थ हिंदू महासभेने सामन्याच्या दिवशी ग्वाल्हेर बंदची घोषणा केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शहरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत बांगलादेश संघाने आज अचानक एक मोठा निर्णय घेतला.

बांगलादेशचा संघ शुक्रवारच्या नमाजासाठीमशिदीत गेला नाही

ग्वाल्हेरमध्ये भारतासोबतच्या टी२० सामन्यापूर्वी बांगलादेशचा क्रिकेट संघ शहरातील मोती मशिदीत शुक्रवारच्या नमाजासाठी गेला नाही. त्याऐवजी त्यांनी आपल्या हॉटेलमध्येच नमाज अदा केली. एका पोलीस अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले, "आम्ही मोती मशिदीभोवती विस्तृत सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती परंतु बांगलादेशचा संघ आला नाही. त्यांच्या प्रवासात कोणताही अडथळा आणणला जाईल असा संकेत कोणत्याही संघटनेकडून आलेला नव्हता. बांगलादेशी संघ ज्या हॉटेलमध्ये थांबला आहे, त्या हॉटेलपासून शहरातील फुलबाग परिसरातील मशीद ३ किमी अंतरावर आहे. त्यामुळे मशिदीत न जाण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाच्या पातळीवर घेण्यात आला असावा." तसेच, 'शहर काझी' हॉटेलमध्ये पोहोचले आणि त्यांनी बांगलादेशी क्रिकेटपटूंना दुपारी १ ते २.३० दरम्यान 'नमाज-ए-जुमा' अदा केली अशी माहितीही अधिकाऱ्याने दिली.

बांगलादेशी संघासाठी कडक सुरक्षा व्यवस्था

अधिकाऱ्याने सांगितले की त्यांनी मशिदीच्या बाहेर सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. तेथे अनेक मीडिया कर्मचारी देखील बांगलादेश संघाची वाट पाहत होते. माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियममध्ये बांगलादेश संघ ३ ऑक्टोबरपासून सराव करत आहे. तेथून हॉटेलचे अंतर सुमारे २३ किमी आहे आणि सुरक्षा कड्याच्या आवारात खेळाडू त्यांच्या वेळापत्रकानुसार मुक्तपणे फिरत आहेत. रविवारी ग्वाल्हेरमध्ये होणाऱ्या भारत-बांगलादेश टी२० सामन्यासाठी सुमारे २,५०० हून अधिक पोलीस कर्मचारी आधीच तैनात करण्यात आले आहेत. रविवारी दुपारी दोन वाजल्यापासून पोलिस रस्त्यावर असतील. तर, खेळ संपल्यानंतर चाहते घरी पोहोचेपर्यंत हे पोलिस आपले कर्तव्य बजावतील.

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशबांगलादेशटी-20 क्रिकेटनमाजमशिदपोलिसग्वालियर