Join us

Team India Squad For T20I vs Australia : हार्दिक पांड्या Out; त्याच्या जागी कुणाला मिळाली संधी?

आशिया कप स्पर्धेत 'बादशाहत'; आता वर्ल्ड चॅम्पियनचा रुबाब कायम ठेवण्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 18:07 IST

Open in App

Indian Team Squad For T20I Series Against Australia Hardik Pandya Out Nitish Kumar Reddy Comeback : ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील तीन वनडेसह ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील आशिया कप विजेत्या संघात एक बदल करून ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघ बांधणी करण्यात आलीये. दुखापतीमुळे आशिया कप स्पर्धेतील फायनल मुकणारा हार्दिक पांड्याच्या जागी नितीश कुमार रेड्डीची वर्णी लागली आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

आशिया कप स्पर्धेत 'बादशाहत'; आता वर्ल्ड चॅम्पियनचा रुबाब कायम ठेवण्याची तयारी

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टी-२० आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाने आपला दबदबा दाखवून दिला. या स्पर्धेतील सलग सात विजयासह टीम इंडियानं जेतेपद पटकावले. आता ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसह भारतीय संघ आगामी टी-२० वर्ल्ड कपच्या तयारी सुरु करेल. २०२४ नंतर सलग दुसऱ्यांदा छोट्या फॉरमॅटमध्ये वर्ल्ड चॅम्पियन रुबाब मिरवण्याच्या दृष्टीने ऑस्ट्रेलिया विरुद्धची टी-२० मालिका महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

 T20I मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाचा दबदबा

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये भारत आणि ऑस्ट्रलिया यांच्यात आतापर्यंत ३२ सामने खेळवण्यात आले आहेत. यात टीम इंडियाने २० सामने जिंकले असून ११ सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली आहे. ऑस्ट्रेलियन मैदानात भारतीय संघाने १२ पैकी  ७ सामने जिंकले असून ऑस्ट्रेलियाने ४ सामन्यात विजय मिळवला आहे. तर एक सामना अनिर्णित राहिल्याचे पाहायला मिळाले आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी २० मालिकेसाठी भारतीय संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुबमन गिल (उप कर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंह, वॉशिंग्टन सुंदर.भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी२० मालिकेचं वेळापत्रक

  • पहिला टी२० सामना - २९ ऑक्टोबर, कॅनबरा
  • दुसरा टी २० सामना - ३१ ऑक्टोबर, मेलबर्न
  • तिसरा टी २० सामना - २ नोव्हेंबर , होबार्ट
  • चौथा टी २० सामना - ६ नोव्हेंबर, गोल्ड कॉस्ट
  • पाचवा टी २० सामना - ८ नोव्हेंबर, ब्रिस्बेन
English
हिंदी सारांश
Web Title : Hardik Pandya Out; Nitish Kumar Reddy in India T20I Squad

Web Summary : Hardik Pandya's injury leads to Nitish Kumar Reddy's inclusion in India's T20I squad against Australia. Suryakumar Yadav leads the team for the five-match series, crucial for T20 World Cup preparation. India dominates T20Is against Australia with 20 wins out of 32 matches.
टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाटी-20 क्रिकेटभारतीय क्रिकेट संघहार्दिक पांड्याभारतीय क्रिकेट संघबीसीसीआय