Join us
Daily Top 2Weekly Top 5

चेन्नईत जोरदार पाऊस, काल सराव सत्रही रद्द; भारत अन् ऑस्ट्रेलियाचा आज रंगणार सामना

IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ विजयाने स्पर्धेची सुरुवात करण्याचा प्रयत्न करतील.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2023 09:46 IST

Open in App

IND vs AUS: आशियाई क्रीडा स्पर्धेत शंभरावर पदके जिंकण्याचा जल्लोष देशभर साजरा होत असताना रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ वनडे विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात आज पाचवेळा जगज्जेता राहिलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध भिडणार आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघाला नमविणे सोपे नाही, याची भारताला जाणीव आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ विजयाने स्पर्धेची सुरुवात करण्याचा प्रयत्न करतील. मात्र, पावसामुळे दोन्ही संघाची निराशा होऊ शकते. आकाशात काळे ढग दिसत आहेत. अशा परिस्थितीत पावसामुळे सामन्यात व्यत्यय येण्याची भीती चाहत्यांना आहे. संध्याकाळचे सराव सत्रही रद्द करावे लागले. ऑस्ट्रेलियन संघाने हवामानाचा विचार करून इनडोअर सत्रात भाग घेतला. अशा स्थितीत पावसाचा परिणाम सामन्यावर दिसून येईल, असे बोलले जात आहे.

सामन्यादरम्यान हवामान कसे असेल?

चेन्नईत दुपारी दोन वाजता सामना सुरू होईल. त्याआधी अर्धा तास टॉस होणार आहे. Accuweather.com नुसार चेन्नईमध्ये दुपारी तापमान ३३ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. पावसाची शक्यता नाही, परंतु ढगाळ वातावरण असू शकते. ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता २१ टक्के आहे. मात्र, चेन्नईतील पावसाबाबत कोणीही काही सांगू शकत नाही. गेल्या काही दिवसांच्या वातावरणाने चाहत्यांना धास्तावले आहे.

रोहितची परीक्षा

अश्विनला तिसरा फिरकीपटू म्हणून खेळविणे, सूर्याची उपयुक्तता, शार्दूल ठाकूरला प्रोत्साहन देणे आणि मिचेल स्टार्कसारख्याला घाबरण्याची गरज नाही हे ईशान किशनला समजावून सांगणे, अशा विविध पातळ्यांवर रोहितची परीक्षा असेल.

विश्वचषकासाठी दोन्ही संघ

ऑस्ट्रेलिया: पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, शॉन अॅबॉट, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा, मिचेल स्टार्क.

भारत:रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपभारतआॅस्ट्रेलियारोहित शर्माविराट कोहलीचेन्नई