Join us

जो जीव तोडून मेहनत घेतोय त्याला BCCI नं येड्यात काढलं? मुंबईकरासाठी बड्या राजकीय नेत्याची बॅटिंग

मुंबईकराचा देशांतर्गत क्रिकेटमध्ये कमालीचा रेकॉर्ड, फिटनेसवरही केलं काम, पण..

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 14:18 IST

Open in App

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या मैदानातील कसोटी मालिकेआधी  भारत 'अ' विरुद्ध दक्षिण आफ्रिका 'अ' संघात दोन सामन्यांची चारदिवसीय कसोटी मालिका रंगणार आहे. या मालिकेसाठी भारतीय 'अ' संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली. या मालिकेसाठी अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. पण रणजी करंडक स्पर्धेत धमक दाखवूनही सरफराज खानची भारत 'अ' संघात वर्णी लागलेली नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर सरफराज खान सातत्याने टीम इंडियाबाहेर आहे. जीव तोडून मेहनत घेतोय त्याला BCCI नं पुन्हा येड्यात काढलं का? असा प्रश्न निर्माण होत असताना या मुंबईकरासाठी राजकीय नेत्यानं बॅटिंग केली आहे. सरफराज खानची भारतीय 'अ' संघात निवड का झाली नाही? असा प्रश्न उपस्थितीत करत  बड्या राजकीय नेत्यानं BCCI निवडकर्त्यांवर निशाणा साधला आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

देशांतर्गत क्रिकेटमध्ये कमालीचा रेकॉर्ड, फिटनेसवरही केलं काम, पण..

रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील भारतीय 'अ' संघ ३० ऑक्टोबरपासून पाहुण्या दक्षिण आफ्रिकेच्या 'अ' संघाविरुद्ध चारदिवसीय मालिकेतील पहिला सामना खेळणार आहे. या सामन्यात देशांतर्गत क्रिकेटमध्ये ६५ पेक्षा अधिकच्या सरासरीनं धावा करणारा सरफराजला संधी मिळालेली नाही. टीम इंडियात कमबॅक करण्यासाठी  या मुंबईकर क्रिकेटपटूनं फिटनेसवर कमालीची मेहनत घेतली आहे. पण  निवडकर्त्यांनी मात्र त्याला भाव दिलेला नाही.  

IND vs AUS : 'मी सचिनपेक्षाही अधिक धावा केल्या असत्या!' पण… ऑस्ट्रेलियन क्रिकेटरचा मोठा दावा

सरफराज खान भारत 'अ' संघात का नाही? खासदाराचे ट्विट व्हायरल

टीम इंडियात कमबॅकसाठी धडपडणाऱ्या सरफराज खानला भारतीय 'अ' संघात संधी न मिळाल्याचा मुद्दा सध्या चांगलाच गाजत आहे. यासंदर्भात  एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी थेट BCCI निवडकर्त्यांवर निशाणा साधला आहे. ओवैसी यांनी सरफराज खानसंदर्भात केलेले ट्विट सध्या लक्षवेधी ठरत आहे. सरफराज खान भारत 'अ' संघात का नाही? असा प्रश्न उपस्थितीत करत औवेसी यांनी बीसीसीआय निवडकर्त्यांना बाउन्सर मारल्याचे दिसते. त्यांचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर बाकावर बसवलं, आता टीम इंडियानं त्याच्यासाठी लावलीये नो एन्ट्रीची पाटी

सरफराज खान हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियाच्या ताफ्यात दिसला होता. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील एकाही सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नव्हती. इंग्लंड विरुद्धच्या दौऱ्यात तो भारतीय 'अ' संघाकडून खेळताना दिसले. या दौऱ्यात टीम इंडियाकडून त्याने ९२ धावांची लक्षवेधी खेळी केली होती. इंट्रा स्क्वॉड सामन्यातही त्याने खणखणीत शतकह ठोकल्याचे पाहायला मिळाले. बुची बाबू ट्रॉफी स्पर्धेत मुंबई संघाकडून खेळताना तो दुखापतग्रस्त झाला. यातून सावरत तो आता रणजी करंडक स्पर्धेत मुंबईकडून पुन्हा मैदानात उतरला आहे. या सामन्यात त्याने खास छापही सोडली. पण तरीही दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या भारत 'अ' संघात त्याची वर्णी लागलेली नाही. याचा अर्थ घरच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातही त्याच्या नावाचा विचार होणार नाही, असेच दिसते.  

 

English
हिंदी सारांश
Web Title : Why isn't Sarfaraz in Team India? Politician slams BCCI selectors.

Web Summary : Sarfaraz Khan's exclusion from India 'A' sparks controversy. Despite consistent domestic performance, he's overlooked. A politician criticizes BCCI selectors, questioning the decision. Fitness improvements ignored?
टॅग्स :सर्फराज खानभारतीय क्रिकेट संघअसदुद्दीन ओवेसीभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका