Join us

IND vs AUS 4th T20I Live Streaming: बरोबरीचा डाव साधला; आता मालिकेत पकड मजबूत करण्याची वेळ!

IND vs AUS 4th T20I Match Live Streaming Date Time : इथं एक नजर टाकुयात  हा सामना कुठं अन् कसा पाहता येईल? त्यासंदर्भातील सविस्तर माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 02:52 IST

Open in App

IND vs AUS 4th T20I Match Live Streaming Date Time  : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ पाच सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामन्यासाठी सज्ज आहेत. पहिला सामना पावसामुळे अनिर्णित राहिल्यावर दोन्ही संघानी प्रत्येकी एक-एक सामना जिंकला आहे. मालिका १-१ अशी बरोबरीत असून चौथा सामना जिंकेल तो मालिका गमावणार नाही, हे चित्र स्पष्ट होईल. भारतीय संघ या मैदानात पहिल्यांदाच खेळणार आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादवच्या नेतृ्वाखालील संघासाठी या सामन्यात एक नवे चॅलेंज असेल. इथं एक नजर टाकुयात  हा सामना कुठं अन् कसा पाहता येईल? त्यासंदर्भातील सविस्तर माहिती

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

सामना कुठं अन् कधी रंगणार? कसा आहे या मैदानातील रेकॉर्ड?

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा टी-२० सामना गुरुवारी, ६ नोव्हेंबर, २०२५ रोजी क्विन्सलँड येथील कॅरारा ओव्हलच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. आधीच उल्लेख केल्याप्रमाणे भारतीय संघ या सामन्यात पहिल्यांदा मैदानात उतरेल. आतापर्यंत इथं ऑस्ट्रेलियन पुरुष संघानेही फक्त दोनच सामने खेळले आहेत. १७ नोव्हेंबर २०१८ रोजी ऑस्ट्रेलियन संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध या मैदानात पहिला टी-२० सामना खेळला होता. यात यजमान संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.  २०२२ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात या मैदानात अखेरचा टी-२० सामना खेळवण्यात आला होता. यात यजमानांनी बाजी मारली होती.

"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी

IND vs AUS 4th T20I Live Streaming सह टेलिव्हिजनवर कुठं घेता येईल या सामन्याचा आनंद?

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या टी-२० सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग जियो हॉटस्टार अ‍ॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल. याशिवाय स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या वेगवेगळ्या चॅनेलवर वेगवेगळ्या भाषेतील समालोचनासह क्रिकेट चाहत्यांना या सामन्याचा आनंद घेता येईल.

किती वाजता सुरु होईल हा सामना?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा टी-२० सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार, १ वाजून ४५ मिनिटांनी सुरु होईल. त्याआधी अर्धा तास म्हणजे १ वाजून १५ मिनिटांनी दोन्ही संघातील कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात उतरतील.

दोन्ही संघ बदलासह उतरणार मैदानात

 चौथ्या टी-२० सामन्याआधी दोन्ही संघात बदल झाले आहेत. भारतीय संघाने घरच्या मैदानातील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीच्या आनुषंगाने कुलदीप यादवला रिलीज केले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेआधी कुलदीप यादव भारत 'अ' संघाकडून दक्षिण आफ्रिका 'अ' संघाविरुद्धच्या अनौपचारिक कसोटी सामन्यात खेळताना दिसणार आहे. त्याच्या जागी भारतीय संघात कुणाला संधी मिळणार ते पाहण्याजोगे असेल. ऑस्ट्रेलियन संघाने अ‍ॅशेस कसोटी मालिकेच्या तयारीसाठी ट्रॅविस हेडला अखेरच्या दोन सामन्यातून रिलीज केले आहे. तो शेफील्ड शील्ड स्पर्धेत सहभागी होणार आहे. त्याच्या जागी ग्लेन मॅक्सवेल ऑस्ट्रेलियन संघातून खेळताना दिसण्याची शक्यता आहे. एकंदरीत हा सामना मालिका कुणाच्या बाजूनं झुकणार ते ठरवणारा असल्यामुळे अधिक रंगदार होईल. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : IND vs AUS 4th T20I: Series level, time to dominate!

Web Summary : India and Australia clash in the crucial 4th T20I. The series is tied 1-1. India plays at Carrara Oval for the first time. Live streaming is available on Jio Hotstar. The match starts at 1:45 PM IST. Both teams will see changes in their lineup.
टॅग्स :भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा २०२५भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाभारतीय क्रिकेट संघसूर्यकुमार यादवगौतम गंभीर