Shubman Gill Century, IND vs AUS 2nd ODI Live Updates: भारतीय संघाचा युवा सलामीवीर शुबमन गिल याने तुफानी फलंदाजी करत ९२ चेंडूत दमदार शतक झळकावले. ऑस्ट्रेलियाने भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिले. भारताने त्यांच्या या निर्णयाचा पुरेपूर वापर केला. सलामीवीर ऋतुराज लवकर बाद झाल्यावर शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर दोघांनी द्विशतकी भागीदारी केली. श्रेयस अय्यर शतक ठोकून बाद झाला. त्यानंतर गिलने मैदानातील फटकेबाजी सुरू ठेवून ९२ चेंडूंचा सामना करत आपले शतक साजरे केले. या दोघांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारताने २५०नजीक मजल मारली. पण त्यानंतर गिलदेखील १०४ धावांवर माघारी परतला.