Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND A vs SA A 1st ODI Live Streaming : तिलक वर्माच्या कॅप्टन्सीत अभिषेक-ऋतुराज उतरणार मैदानात; पण टीव्हीवर दिसणार नाही मॅच!

 भारत 'अ' विरुद्ध दक्षिण आफ्रिका 'अ' यांच्यातील सामना कधी अन् कुठं रंगणार? जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 22:06 IST

Open in App

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कोलकाता कसोटी आधी तिलक वर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय 'अ' संघ राजकोटच्या मैदानात दक्षिण आफ्रिका 'अ' विरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेसाठी मैदानात उतरेल. १३ नोव्हेंबरला राजकोटच्या मैदानातून या मालिकेला सुरुवात होत आहे. तिलकच्या नेतृत्वाखालील संघातून ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा आणि ईशान किशन हे स्टार खेळाडू आपला जलवा दाखवताना दिसतील. इथं एक नजर टाकुयात अनौपचारिक वनडे मालिकेतील सामना कधी अन् कुठं रंगणार? क्रिकेट चाहते या सामन्याचा आनंद कसा घेऊ शकतील यासंदर्भातील सविस्तर माहिती

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

 भारत 'अ' विरुद्ध दक्षिण आफ्रिका 'अ' यांच्यातील सामना कधी अन् कुठं रंगणार?

भारत 'अ' विरुद्ध दक्षिण आफ्रिका 'अ' संघातील सामना राजकोटच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. तीन सामन्यांच्या या वनडे मालिकेतील सर्व सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार, १ वाजून ३० मिनिटांनी सुरु होणार असून त्याआधी १ वाजता दोन्ही संघातील कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात उतरतील. 

नो टेलिव्हिजन शो! ओन्ली लाइव्ह स्ट्रीमिंग 

भारत 'अ' विरुद्ध दक्षिण आफ्रिका 'अ' यांच्यातील अनौपचारिक वनडे मालिकेतील थेट प्रेक्षपण टेलिव्हिजनवर होणार नाही. पण IND A vs SA A 1st ODI Live Streaming चाहत्यांना जिओ हॉटस्टारवर पाहता येईल. 

भारत 'अ' विरुद्ध दक्षिण आफ्रिका 'अ' वनडे मालिकेचे वेळापत्रक

  • पहिला वनडे सामना-१३ नोव्हेंबर २०२५ (राजकोट)
  • दुसरा वनडे सामना-१६ नोव्हेंबर २०२५ (राजकोट)
  • तिसरा वनडे सामना-१९ नोव्हेंबर २०२५ (राजकोट)

भारत 'अ' संभाव्य प्लेइंग इलेव्हन 

तिलक वर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, रियान पराग, ईशान किशन (विकेटकीपर), आयुष बडोनी, निशांत सिंधु, विप्राज निगम, मानव सुथार, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, खलील अहमद, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर).

दक्षिण आफ्रिका 'अ' संभाव्य प्लेइंग इलेव्हन 

मार्क ऐकरमॅन (कर्णधार), जॉर्डन हरमॅन, सिनेथेम्बा केशिले, जेसन स्मिथ, डेलानो पोटगाइटर, कोडी युसुफ, रुबीन हरमॅन, रिवाल्डो मूनसमी, लुआन ड्रे प्रेटोरियस, ओनटाइल बार्टमॅन, बीजोर्न फोर्टुइन, क्वेना मफाका, शेपो मोरेकि, मिहलाली एमपोन्गवाना, नकाबायोमजी पीटर.

English
हिंदी सारांश
Web Title : India A vs South Africa A ODI series: All you need to know.

Web Summary : Tilak Varma leads India A against South Africa A in a three-match ODI series starting November 13th in Rajkot. Ruturaj Gaikwad and Abhishek Sharma are key players. Matches will be live-streamed on Jio Hotstar.
टॅग्स :दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा २०२५भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकातिलक वर्माअभिषेक शर्माऋतुराज गायकवाडइशान किशन