IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की

तिलक वर्मा अन् रियान पराग जोडी जमली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 18:40 IST2025-10-03T18:33:21+5:302025-10-03T18:40:19+5:30

whatsapp join usJoin us
IND A vs AUS A Tilak Verma 94 Runs Riyan Parag Fifty Abhishek Sharma Shreyas Iyer Fail India A Scored 246 Runs vs Australia A | IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की

IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India A vs Australia A  Tilak Verma Miss Century: आशिया कप स्पर्धेतील फायनलमध्ये पाकिस्तानची जिरवणारा तिलक वर्मा ऑस्ट्रेलिया 'अ'  विरुद्धच्या दुसऱ्या वनडेत भारतीय 'अ' संघासाठी संकटमोचकाच्या रुपात धावून आला. कानपूर येथील ग्रीन पार्कच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात भारत 'अ' संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर, अभिषेक शर्मासह प्रभसिमरन सिंग स्वस्तात तंबूत परतल्यावर भारतीय संघ अडचणीत सापडला होता. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या तिलक वर्मा आणि रियान पराग यांनी केलेल्या दमदार खेळीच्या जोरावर भारती 'अ' संघाने ४५.५ षटकात २४६ धावांपर्यंत मजल मारली.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

अभिषेक शर्माच्या पदरी 'गोल्डन डक'ची नामुष्की 

श्रेयस अय्यरनं टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतल्यावर भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. आशिया कप स्पर्धा गाजवणारा अभिषेक शर्मा पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्याच्यावर गोल्डन डकची नामुष्की ओढावली. प्रभसिमरन सिंग १० चेंडूचा सामना करून अवघ्या एका धावेची भर घालून बाद झाला. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या श्रेयस अय्यरलाही ८ (१३) या मॅचमध्ये दुहेरी आकडा गाठता आला नाही.  अवघ्या १७ धाांवर आघाडीचे तीन फलंदाज तंबूत परतले होते.

नवरोबानं सेंच्युरी मारल्यावर वाजवली शिट्टी! बायकोनं ती खास 'फ्रेम' केली व्हायरल

तिलक वर्मा-रियान पराग जोडीनं डाव सावरला, पण...

तिलक वर्मानं पुन्हा एकदा संघ अडचणीत असताना दबावात जबरदस्त कामगिरी करण्याची आपल्यातील क्षमता दाखवून दिली. रियान परागच्या साथीनं त्याने चौथ्या विकेटसाठी १०१ धावांची भागीदारी केली.  रियान पराघ ५४ चेंडूत ५८ धावा केल्या. तिलक वर्मा शतकाच्या दिशेनं वाटटाल करत होता. पण ४५ व्या षटतील शेवटच्या चेंडूवर तो फसला. जॅक एडवर्ड्सनं त्याच्या खेळीला ब्रेक लागवला. त्याच्यासह भारतीय संघाचा डजावही २४६ धावांवर आटोपला. तिलक वर्मानं १२२ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ९४ धावांची खेळी केली.

Web Title : तिलक वर्मा का शतक चूका; अभिषेक शर्मा ऑस्ट्रेलिया के खिलाफ 'गोल्डन डक' पर आउट।

Web Summary : ऑस्ट्रेलिया ए के खिलाफ शुरुआती विकेट गिरने के बाद तिलक वर्मा के 94 और रियान पराग के 58 रनों ने भारत ए को बचाया। अभिषेक शर्मा गोल्डन डक पर आउट हो गए।

Web Title : Tilak Varma misses century; Abhishek Sharma's 'Golden Duck' against Australia.

Web Summary : Tilak Varma's 94 and Riyan Parag's 58 rescued India A after early wickets against Australia A. Abhishek Sharma got out on a golden duck.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.