लव्ह जिहाद! रिंकू सिंगनं ५ षटकार मारलेला 'यश दयाल' वादात; वादग्रस्त पोस्ट अन् माफीनामा

yash dayal ipl 2023 : गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 01:57 PM2023-06-05T13:57:22+5:302023-06-05T13:58:53+5:30

whatsapp join usJoin us
In IPL, Gujarat Titans player Yash Dayal posted a controversial Instagram story on love jihad and later apologized  | लव्ह जिहाद! रिंकू सिंगनं ५ षटकार मारलेला 'यश दयाल' वादात; वादग्रस्त पोस्ट अन् माफीनामा

लव्ह जिहाद! रिंकू सिंगनं ५ षटकार मारलेला 'यश दयाल' वादात; वादग्रस्त पोस्ट अन् माफीनामा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Yash Dayal Instagram Story : गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज यश दयाल वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. इंस्टाग्रामवर केलेली एक पोस्ट यशला चांगलीच महागात पडल्याचे दिसते. चाहत्यांच्या टीकेनंतर अखेर त्याला माफी देखील मागावी लागली. यशच्या इंस्टा स्टोरीचा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. यश दयालने केलेल्या वादग्रस्त पोस्टवर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. चाहत्यांच्या आक्रोशानंतर यशने याबद्दल स्पष्टीकरण दिले असून चुकीबद्दल माफी मागितली आहे. मुस्लिम विरोधी स्टोरी डिलीट केल्यानंतर यश दयालने नवीन स्टोरी ठेवून माफी मागितली आहे. 

तसेच ही स्टोरी चुकून पोस्ट झाली असल्याचं देखील दयालनं म्हटलं आहे. आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरूद्धच्या सामन्यानंतर यश दयाल चर्चेत आला होता. तेव्हा केकेआरच्या रिंकू सिंगने त्याला अखेरच्या षटकात ५ षटकार ठोकून इतिहास रचला. शेवटच्या ५ चेंडूत ५ षटकार ठोकून रिंकूने गुजरातच्या तोंडचा घास पळवून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. अखेरच्या षटकात केकेआरला २८ धावांची गरज असताना रिंकूने अविस्मरनीय खेळी करून विजय मिळवला. 

इंग्लिश खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांची 'अग्निपरीक्षा', WTC फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला रोखण्याचं आव्हान

यश दयालने मागितली माफी 
वादग्रस्त पोस्टनंतर यश दयालने स्टोरी ठेवून माफी मागितली. "माझ्याकडून चूक झाली आहे. मित्रांनो, मी माझ्या स्टोरीवरून माफी मागतो. मी चुकीने स्टोरी पोस्ट केली. कृपया, द्वेष पसरवू नका. मी प्रत्येक धर्माचा सन्मान करतो", अशा शब्दांत यश दयालनं माफी मागितली. 

दरम्यान, केकेआरविरूद्धच्या त्या सामन्यानंतर यश दयालला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले. गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने रिंकू सिंगच्या आक्रमक फलंदाजीनंतर यश दयाल आजारी पडल्याचे सांगितले होते. रिंकू सिंगने पाच षटकार मारल्यानंतर यश दयालचे वजन ७-८ किलोने कमी झाल्याचे त्याने सांगितले होते.

Web Title: In IPL, Gujarat Titans player Yash Dayal posted a controversial Instagram story on love jihad and later apologized 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.